-
एमएस धोनी
क्रिकेट सुपरस्टार महेंद्रसिंग धोनीवर आधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटानेही धुमाकूळ घातला. या चित्रपटासाठी धोनीने ४५ कोटी रुपये घेतले होते. (Still From Film) -
संजय दत्त
‘संजू’ चित्रपटात संजय दत्तची जीवनकथा दाखवण्यात आली होती, ज्यामध्ये रणबीर कपूरने त्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी संजयने ९ कोटी रुपये फी आणि नफ्यात वाटा घेतला. (Still From Film) -
कपिल देव
कपिल देव यांच्या बायोपिक ‘८३’मध्ये रणवीर सिंगने त्यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी कपिल देव यांनी ५ कोटी रुपये घेतले होते. (Still From Film) -
महावीर सिंग फोगट
‘दंगल’ चित्रपटात आमिर खानने महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी महावीर यांनी फक्त एक कोटी रुपये घेतले होते. (Still From Film) -
सायना नेहवाल
परिणीती चोप्राने बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिक ‘सायना’मध्ये काम केले होते. या चित्रपटासाठी सायनाने ५० लाख रुपये फी घेतली होती. (Still From Film) -
मेरी कोम
प्रियांका चोप्राने ‘मेरी कॉम’ या बायोपिकमध्ये बॉक्सिंगच्या जगात आपले नाव कमावणाऱ्या मेरी कोमची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी मेरीने २५ लाख रुपये फी घेतली होती. (Still From Film) -
लक्ष्मी अग्रवाल
‘छपाक’ चित्रपटात दीपिका पदुकोणने ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली होती. यासाठी लक्ष्मीने केवळ १३ लाख रुपये फी घेतली. (Still From Film) -
मिल्खा सिंग
‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. या बायोपिकसाठी मिल्खा सिंग यांनी फक्त एक रुपया घेतला होता. (Still From Film) -
मोहम्मद अझरुद्दीन
इमरान हाश्मीने ‘अजहर’ या बायोपिकमध्ये क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनची भूमिका साकारली होती. अझरुद्दीनने या चित्रपटासाठी कोणतेही शुल्क घेतले नाही. (Still From Film) -
आयपीएस मनोजकुमार शर्मा
विक्रांत मेसीने आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या बायोपिक ‘१२ th फेल’मध्ये काम केले होते. या चित्रपटासाठी मनोजने एकही पैसा घेतला नाही. (Still From Film)
हेही पाहा – Do Patti चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार क्रिती सेनॉन, आतापर्यंत ‘या’ बॉलीवूड अभिनेत्…

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख