-
बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर अनेकदा तिच्या अनोख्या आणि स्टायलिश फॅशन सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. यावेळी दिवाळीच्या मुहूर्तावर सोनमने तिच्या पारंपरिक अवताराने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही सुंदर छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात ती तिने मातीपासून बनवलेले बॉडी ऑरनामेंट परिधान केले आहे. याबरोबर तिने सुंदर दागिने पेअर केलेले दिसत आहेत.
-
तिच्या दिवाळी लूकसाठी सोनम खासकरून खादीचा लेहेंगा आणि मातीपासून बनवलेल्या अनोख्या चोलीमध्ये दिसत आहे. तिची ही चोली कर्नाटकातील लाल माती आणि मुलतानी मातीपासून बनलेली आहे, जी खरोखरच एक अद्वितीय आणि प्रभावी फॅशन वाटत आहे.
-
यासोबत सोनमने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला खादीचा लेहेंगा घातला आहे, जो तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
-
सोनम कपूरचा हा दिवाळी लूक तिची धाकटी बहीण रिया कपूर आणि तिची स्टायलिंग टीम वंशिका मक्कर आणि सनाया कपूर यांनी तयार केला आहे.
-
या ड्रेससह, अभिनेत्रीने तिच्या हातावर मेहंदी लावली आहे, मिनिमल मेकअप केला आहे आणि जाड दागिन्यांमध्ये ती आश्चर्यकारक दिसत आहे.
-
फोटोंच्या कॅप्शनमध्ये पोशाखाबद्दल बोलताना सोनम कपूरने लिहिले की, “हा केवळ एक पोशाख नाही तर आपल्या मातीशी आणि परंपरांशी जोडलेली एक खास भावना आहे.”
-
तिच्या पोस्टमध्ये या पोशाखाबद्दल बोलताना सोनम कपूरने लिहिले की, हा केवळ एक कपडा नाही तर आपल्या मातीशी आणि परंपरांशी जोडलेली एक भावना आहे.
-
दिवाळीत सोनम कपूरचा पारंपारिक अवतार, मुलतानी मिट्टी चोला आणि खादीचा लेहेंगा परिधान (सर्व फोटो साभार – सोनम कपूर इन्स्टाग्राम)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”