-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मधील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे.
-
मुक्ता, सागर, सावनी, माधवी, इंद्रा, सई या पात्रांप्रमाणे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील इतर पात्रांनी अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्वाती.
-
अभिनेत्री कोमल सोमारे गजमलने स्वाती ही भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे.
-
काही दिवसांपूर्वी २० ऑक्टोबरला स्वाती म्हणजे कोमलचा वाढदिवस होता.
-
स्वातीचा वाढदिवस ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
-
सेटवरील वाढदिवसाचे फोटो स्वातीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये मुक्ता, इंद्रा, लकी असे मालिकेतील सर्वजण स्वातीचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.
-
विशेष म्हणजे मालिकेतील कलाकारांनी स्वातीच्या वाढदिवसानिमित्ताने मेकअप रूम फुग्यांनी सुंदर सजवलेली पाहायला मिळत आहे.
-
( सर्व फोटो सौजन्य – कोमल सोमारे गजमल इन्स्टाग्राम )

Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…