-
साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या चर्चेत आहे. तिचे भारतभर खूप मोठे चाहते (sai pallavi fans) आहेत. अभिनेत्री बॉलिवूडमध्येही लवकरच पदार्पण करेल अशी चर्चा सुरू आहे.
-
दरम्यान, ट्विटरवर बॉयकॉट साई पल्लवी (#BoycottSaiPalavi) असा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे साई पल्लवी अडचणीत येण्याची शक्यता आहे. असं काय घडलं आहे? की हा ट्रेंड सुरू आहे, याबद्दल जाणून घेऊयात.
-
तर त्याचे झाले असे की सध्या एक्सवर (x) तिची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल (Viral Video Clip) होत आहे. ज्यामध्ये साईने भारतीय सैन्याबद्दल (Indian Army) एक वक्तव्य केलेलं दिसत आहे.
-
दरम्यान ही व्हिडिओ क्लिप तिच्या जुन्या मुलाखतीतील (Old Interview) आहे.
-
काय म्हणाली आहे ती व्हिडिओ क्लिपमध्ये?
‘विराट पर्वम’ (Virat Parvam) या चित्रपटाचं प्रमोशन करताना अभिनेत्रीने एक वक्तव्य केलेलं ती म्हणाली होती “भारतीय सैन्याला पाकिस्तान (Pakistan) दहशतवादी समजतो, त्यानुसार पाकिस्तानी लोकही भारतीय सैनिकांना दहशतवादी समजतात. त्यांना वाटतं आपण त्यांचं नुकसान करू शकतो. हा दृष्टिकोनाचा विषय आहे” -
दरम्यान साई पल्लवीच्या या स्टेटमेंटवरून सध्या तिला ट्रोल (Troll) केलं जात आहे, तसचं तिचा रामायण (Ramayan Movie) हा आगामी चित्रपट असेल किंवा आता दिवाळीत प्रदर्शित होणारा अमरान (Amaran Movie) चित्रपट असेल त्याला पाहायला जाऊ नका अशी भूमिका घेतली जात आहे.
-
दरम्यान या प्रकरणावर अद्याप तरी अभिनेत्री साई पल्लवीची भूमिका पुढे आलेली नाही.
-
तिचा अमरान हा तमिळ चित्रपट (Amaran Tamil Movie) दिवाळी निमित्त ३० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित (Diwali Release) होत आहे. या चित्रपटात ती सिवा कर्थियान (Siva Karthiyaan) बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपटही सध्या खूप चर्चेत आहे.
-
(सर्व फोटो साभार – साई पल्लवी इन्स्टाग्राम)
हेही पाहा – Photos : तमन्ना भाटीयाचा गुलाबी लेहेंग्यातील बहारदार लूक पाहून चाहते घायाळ, दिवाळीसाठी तुम्हीही ट्राय करु शकता
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन