-
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकताच तिचा लेटेस्ट फेस्टिव्ह लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये भूमी पेडणेकरने सुंदर पारंपरिक लूक केला आहे.
-
भूमीने हेवी एम्ब्रॉयडरी आणि मिरर वर्कचे डिझाइन असलेली साडी नेसली आहे, जी खूप रिच आणि रॉयल लुक देतेय. जरी वर्क आणि चमकदार काचांंच्या वर्कसह साडीचा पदर खूप वेगळ्या शैलीत डिझाइन केला आहे.
-
साडीचा रंग गोल्डन-बेज टोनमध्ये आहे, जो अभिनेत्रीला रॉयल लुक देत आहे. भूमीने साडीसोबत घातलेला ब्लाउजही पूर्णपणे मिरर करण्यात आला आहे.
-
या ब्लाउजमध्ये हाफ स्लीव्हज आणि हाय नेक डिझाइन आहे, ज्यामुळे तिचा लूक आणखी रॉयल आणि क्लासिक होत आहे.
-
तिच्या लूकमध्ये ऍक्सेसरीझ करण्यासाठी, भूमीने मिरर आणि स्टोन वर्कसह हेवी चोकर नेकलेस घातला होता. तो तिच्या साडी आणि ब्लाउजच्या मिरर वर्कशी पूर्णपणे जुळत आहे आणि तिचा रॉयल लुक पूर्ण करत आहे.
-
भूमीचा मेकअप सटल आणि ग्लॅमरस आहे. तिने तिची आयशॅडो न्यूट्रल टोनमध्ये ठेवली आहे आणि आयलाइनर आणि मस्करासह तिच्या डोळ्याच्या मेकअपवर जोर दिला आहे. तिने तिच्या ओठांवर न्यूड लिपस्टिक लावली आहे, जी तिच्या संपूर्ण लूकमध्ये संतुलन राखत आहे.
-
भूमीने तिचे केस मागच्या बाजूला घट्ट बांधून त्यात गजरा माळला आहे. यामुळे तिचा लूक सिंपल आणि एलिगंट दिसत आहे.
-
(सर्व फोटो साभार: @bhumipednekar/instagram)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन