-
बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये तिने तिचा दिवाळी लूक रिव्हील केला आहे.
-
यावेळी शर्वरीने तिला ‘देसी फ्लेवर’ पसंत असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
-
दरम्यान, या फोटोंमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
-
तिने प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि सँडी खोसला यांनी डिझाइन केलेला सुंदर सोनेरी आणि रंगीबेरंगी लेहेंगा घातला होता.
-
शर्वरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘दिवाळीसाठी देसी मसाला आणि केळीचे वेफर्स हे माझे आवडते फ्लेवर आहेत, माझ्या या लुकमधून मला खास दाखवण्यासाठी अबू जानी आणि सँडी खोसला तुमचे धन्यवाद, खरोखरचं हा माझा आजपर्यंतचा आवडता लूक आहे.
-
दरम्यान, याआधीही अभिनेत्रीने काही फोटो शेअर केले होते.
-
ज्यामध्ये ती डबल लेयर्ड घागरा परिधान करून खूपच सुंदर दिसत होती.
-
हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘दिवाळी ग्लिटर!’
-
अभिनेत्रीचे हे सर्व फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
यंदाचे हे वर्ष शर्वरीसाठी खूप यशस्वी ठरले आहे.
-
तिने यावर्षी सुरुवातीला ‘महाराज’ या हिट चित्रपटात अभिनय केला.
-
त्यानंतर निखिल अडवाणीच्या ‘वेद’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.
-
याशिवाय ती १०० कोटी कमवणाऱ्या सुपरहिट मुंज्या या चित्रपटातही दिसली होती.
-
शर्वरी वाघ सध्या तिच्या पुढील ‘अल्फा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
-
‘द रेल्वे मॅन’ फेम शिव रवैल दिग्दर्शित या चित्रपटात ती आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
-
आलिया आणि शर्वरी दोघीही काश्मीरमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहेत.
-
(सर्व फोटो साभार – शर्वरी वाघ इन्स्टाग्राम)
हेही पाहा – Photos : झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाचे लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीनिमित्त सुंदर फोटोशूट!
माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”