-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे अक्षरा-अधिपतीची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली आहे.
-
मालिकेत अक्षराचं पात्र अभिनेत्री शिवानी रांगोळे तर, अधिपतीची भूमिका अभिनेता हृषिकेश शेलार साकारत आहे.
-
या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
-
शिवानीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त अधिपतीने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
-
अधिपतीने त्यांचे कधीही न पाहिलेले सेटवरचे सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोवर त्याने “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मास्तरीण बाई! तुम जियो हजारों साल” असं कॅप्शन दिलं आहे.
-
यातल्या एका फोटोत शिवानी आणि हृषिकेश यांची ऑफस्क्रीन फॅमिली देखील पाहायला मिळत आहे.
-
शिवानीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार विराजस कुलकर्णीबरोबर देखील हृषिकेशचं खूप छान बॉण्डिंग आहे.
-
हृषिकेशच्या पोस्टवर “ओह सगळे फोटो कमाल आहेत” अशी कमेंट करत शिवानी रांगोळेने वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी सर्व चाहते व नेटकऱ्यांचे आभार मानले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : हृषिकेश शेलार इन्स्टाग्राम )

Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…