-
आनंद इतरांबरोबर वाटला तर तो द्विगुणीत होतो असं म्हणतात. अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) या आनंदाची प्रचिती गेल्या २० वर्षांपासून अनुभवतेय.
-
जुई मुळची कर्जतची (Karjat). एकत्र कुटुंबात वाढलेली. त्यामुळे सण कोणताही असो संपूर्ण कुटुंब (Family) एकत्र येऊन तो जल्लोषात साजरा करतात.
-
नातेवाईकांबरोबरचे हे क्षण जुईसाठी खास आहेतच. पण जुईचं आणखी एक कुटुंब आहे जे गेले २० वर्ष तिने अगदी घट्ट जपलं आहे.
-
हे कुटुंब म्हणजे पनवेल (Panvel) इथल्या शांतीवन आश्रमातील निराधार (Shantivan Aashram) आणि कुष्ठरोगाशी झुंज देणारे आजी-आजोबा.
-
कॉलेजमध्ये असल्यापासून जुई न चुकता दिवाळीचा (Diwali 2024) सण या निराधार आजी-आजोबांबरोबर साजरा करते.
-
या उपक्रमात तिला तिच्या मित्रपरिवाराचाही साथ लाभते.
-
दिवाळीच्या दिवशी जुई आणि तिचा मित्रपरिवार मिळून संपूर्ण आश्रम सजवतात.
-
फराळ (Diwali Faral) आणि गोडधोड (Sweets) जेवणाचा बेतही असतो.
-
आजी आजोबांसाठी गाण्याचा कार्यक्रमही साजरा केला जातो.
-
कॉलेजच्या दिवसांमध्ये नाटकाच्या तिकिटातून मिळालेले पैसे या आश्रमाला देणगी स्वरुपात दिले जायचे.
-
आता बरेच जण या उपक्रमाला सढळ हस्ते हातभार लावतात. जे पैसे जमतात ते या आजी-आजोबांचं वर्षभराचं रेशन, औषधपाणी, कपडे यासाठी वापरले जातात.
-
माझ्यावर विश्वास ठेऊन मदतीचा हाच पुढे करणाऱ्या सर्वांचीच मी ऋणी आहे अशी भावना जुईने व्यकत केली.
-
जुईच्या या उपक्रमात आजवर कधीही खंड पडलेला नाही.
-
विशेष म्हणजे कॉलेजचे नवे विद्यार्थीही या उपक्रमात सामील होतात.
-
जुई गडकरीची ‘ठरलं तर मग मालिका’ (Tharala Tar Mag) सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
या मालिकेत जुई साकारत असलेली सायली देखील अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली आहे.
-
त्यामुळे या व्यक्तिरेखासाठी जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने तातडीने होकार दिला होता.
-
या मालिकेत साकारत असलेली सायली खऱ्या आयुष्यातही जुई जगतेय असंच म्हणायला हवं.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा