-
Diwali 2024: दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहेत. याच दिवशी अनेक साउथ चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित होतील.
-
चला तर मग जाणून घेऊया या यादीमध्ये कोणते चित्रपट आहेत. (Photo: Kavin M/Insta)
-
सिंघम अगेन: अजय देवगण, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर सिंघम अगेन १ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. (Photo: Rohit Shetty/Insta)
-
आम्रन : हा साऊथ चित्रपट आज ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. (Photo: Sivakarthikeyan Doss/Insta)
-
भुल भुलैया ३ : कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन स्टारर भुल भुलय्या ३ देखील १ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. (Photos: kartikaaryan/Insta)
-
ब्लडी बॅगर : शिवबालन मुथुकुमार दिग्दर्शित, ब्लडी बॅगर ३१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट एका आळशी भिकाऱ्याच्या कथेभोवती फिरतो. यात केविन, रेडिन किंग्सले, पृथ्वी राज आणि सुनील सुखदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Photo: Kavin M/Insta)
-
ब्रदर : तमिळ कॉमेडी चित्रपट ब्रदर दिवाळीच्या मुहूर्तावर ३१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. (Photo: Screen Seen/Insta)
-
लकी बास्कर : लकी बास्कर हा एक तेलुगू भाषेतील ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे. ज्यामध्ये दुलकर सलमान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. (Photo: Dulkar Salman/Insta)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”