-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप होय.
-
पृथ्वीक सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
पृथ्वीकने त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळशी २५ ऑक्टोबर २०२४ रोजी लग्नगाठ बांधली.
-
पृथ्वीकने लग्नाची बातमी दिल्यावर प्राजक्ता कोण आहे, काय करते याबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.
-
आता या जोडप्याने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांची लव्ह स्टोरी सांगितली.
-
तसेच प्राजक्ता काय करते हेही तिने सांगितलं.
-
प्राजक्ता वायकूळ एचआर आहे. ती म्हणाली, “मी ९ वर्षांपासून नोकरी करते. सुरुवातीला दोन-अडीच वर्षे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत होते, त्यानंतर कॉर्पोरेटमध्ये आले. आता मी अॅडमिन म्हणून काम करते.”
-
प्राजक्ताला अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना अभिनय करायचे. प्राजक्ताने प्रसाद खांडेकरच्या ग्रुपबरोबर काम केलं आहे. या ग्रुपबरोबर काम करतानाच पृथ्वीक व प्राजक्ताची ओळख झाली.
-
पृथ्वीकने तिला प्रपोज केलं आणि तिने होकार दिला. त्यानंतर जवळपास ११ वर्षे ते रिलेशनशिपमध्ये राहिले आणि आता लग्न केलं.
-
पृथ्वीकने याच मुलाखतीत पत्नी प्राजक्ताचं कौतुक केलं. प्राजक्ताने एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम केलं आहे.
-
पृथ्वीक म्हणाला, “तुम्हाला खोटं वाटेल पण सगळ्यांचा रिसर्च कमी पडला आहे. कारण प्राजक्ताने २०१२ या मुलीने आंतरराष्ट्रीय चित्रपट केला आहे. ‘रेड गोल्ड’ असे या चित्रपटाचे नाव आहे.”
-
दोघांपैकी एकाने सेटल व्हायचं आणि एकाने अभिनयक्षेत्रात स्ट्रगल करायचा, असं मिळून ठरवलं. त्यानंतर प्राजक्ता नोकरी करू लागली, तर पृथ्वीकने अभिनयक्षेत्रात यश मिळवलं. (सर्व फोटो – पृथ्वीक प्रताप इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”