-
अनन्या पांडे
अनन्या पांडेने तिच्या चुलत भावाचा मुलगा रिवरबरोबरचा एक खास फोटो शेअर केला, यावेळी तीने पीच सूट परिधान केला होता. (Photo: @ananyapanday/Instagram) -
आयुष्मान खुराना
आयुष्मान खुरानाने त्याच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते त्याने पत्नी ताहिरा कश्यपसोबत फोटो शेअर केले. (Photo: @ayushmannk/Instagram) -
फरहान अख्तर
फरहान अख्तरने शिबानी दांडेकर, जावेद अख्तर, झोया अख्तर आणि शबाना आझमी यांच्यासोबतचे कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दिवाळीच्या शुभेच्छा.” (Photo: @faroutakhtar/Instagram) -
करण जोहर
करण जोहरने आई आणि मुलांसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. खास कपड्यांसाठी त्याने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राचेही आभार मानले. (Photo: @karanjohar/Instagram) -
करीना कपूर
करीना कपूरने सुट्टीतील एक फोटो शेअर करून चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, “स्वप्न पाहण्याची हिम्मत करा, दिवाळीच्या शुभेच्छा मित्रांनो.” (Photo: @kareenakapoorkhan/Instagram) -
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा
बॉलीवूडचे हे सुंदर जोडपे पारंपरिक लूकमध्ये दिवाळी साजरी करताना दिसले. कियाराने पिवळ्या फुलांचा ड्रेस तर सिद्धार्थने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. (Photo: @kiaraaliaadvani/Instagram) -
नम्रता शिरोडकर
महेश बाबू यांची पत्नी नम्रता यांनी मुलगी सिताराचा फोटो शेअर करत लिहिले की, “सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. हे वर्ष सर्वांना शांती आणि समृद्धीचे जावो.” (Photo: @namratashirodkar/Instagram) -
परिणीती चोप्रा
परिणीतीने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती दिवे आणि फुलांनी सजलेली प्लेट हातात धरलेली दिसत आहे. (Photo: @parineetichopra/Instagram) -
रश्मिका मंदान्ना
रश्मिकाने फक्त पांढरा सूट घालून दिवाळी साजरी केली आणि दिवे लावलेले फोटो शेअर केले. (Photo: @rashmika_mandanna/Instagram) -
रवीना टंडन
रवीना आणि तिची मुलगी राशा थडानी यांनीही दिवाळीनिमित्त दिवे लावले आणि प्रार्थना केली आणि काही सुंदर फोटो शेअर केले. (Photo: @officialraveenatandon/Instagram) -
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रा आणि मुलांसोबत दिवाळी साजरी केली. तिने मरून साडी नेसून केसात गजरा घातला आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले. (Photo: @theshilpashetty/Instagram) -
श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरने तिच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली आणि तिच्या घरातील मंदिराचे फोटो शेअर केले. यावेळी तिने फ्लोरल प्रिंटचा ड्रेस परिधान केला होता. (Photo: @shraddhakapoor/Instagram) -
सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हाने आपली पहिली दिवाळी पती जहिर इक्बालसोबत साजरी केली आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सोनाने लिहिले की, “दिवाळीच्या शुभेच्छा, प्रत्येक घरात आनंदी आनंद राहो, अशी मी प्रार्थना करते.” (Photo: @aslisona/Instagram) -
सनी देओल
सनी देओलने दिवाळीनिमित्त त्याचा भाऊ बॉबी देओल आणि त्याच्या मुलांसोबतचे कौटुंबिक फोटो शेअर करून चाहत्यांबरोबर दिवाळी साजरी केली. (Photo: @iamsunnydeol/Instagram) -
वरुण धवन
वरुण धवनने आपल्या कुटुंबासह ऑफिसमध्ये दिवाळीची पूजा केली. (Photo: @varundvn/Instagram)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा