-
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख आज त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुख खानला “किंग खान” म्हणूनही ओळखले जाते. (Photo: Instagram)
-
त्याने त्याच्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो रोमान्ससाठी प्रसिद्ध असला तरी त्याच्या अॅक्शन भूमिकांनीही प्रेक्षकांना आकर्षित केले आहे आणि त्याने विविध प्रकारच्या पात्रांमध्ये त्याची क्षमता सिद्ध केली आहे. (Photo: Instagram)
-
शाहरुखने आतापर्यंत कोणत्या चित्रपटांमध्ये आपल्या अॅक्शन कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे ते जाणून घेऊयात. (Photo: Instagram)
-
१. कोयला (Koyla)
१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुखने जबरदस्त ॲक्शन असलेल्या भूमिकेत काम केले आहे, या चित्रपटात तो अमरीश पुरी यांनी साकरलेल्या खलनायकाला पराभूत करण्यासाठी जीवाची बाजी लावतो. या चित्रपटातील ट्रेनच्या मागे पळण्याचा सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. (Photo: Youtube) -
२. चेन्नई एक्सप्रेस (Chennai Express)
२०१३ मधील हा चित्रपट एक मसाला एंटरटेनर असून, शाहरुखने एका सामान्य माणसाची भूमिका साकारली आहे, जो प्रेमासाठी मोठ्या ताकदीच्या सामना करतो. क्लायमॅक्समधील शाहरुखची अॅक्शन दृश्ये प्रेक्षकांना भुरळ घालतात. (Photo: Youtube) -
३. ब्रह्मास्त्र (Brahmastra)
या चित्रपटात शाहरुख खानने काही मिनिटांसाठी कॅमिओ केला असला तरीही त्याच्या अॅक्शन परफॉर्मन्सने चाहत्यांचे मन जिंकली. (Photo: Youtube) -
४. रईस (Raees)
रईसमध्ये शाहरुखने अनेक थरारक अॅक्शन सीन्स केले आहेत, जे प्रेक्षकांवर प्रभाव टाकतात. हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. (Photo: Youtube) -
५. जोश (Josh)
या चित्रपटात शाहरुखने गँग लीडर मॅक्सची भूमिका साकारली आहे, जी त्याच्या अॅक्शन कौशल्यांचे उत्तम उदाहरण आहे. २००० सली प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूप गाजला. (Photo: Youtube) -
६. वन २ का ४ (One 2 Ka 4)
या थ्रिलर चित्रपटात शाहरुख एका पोलिसाची भूमिका साकारतो आणि या चित्रपटातील थरारक ॲक्शन सीन प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात. (Photo: Youtube) -
७. मैं हूं ना (Main Hoon Na)
या कल्ट हिटमध्ये शाहरुख आणि सुनील शेट्टी यांच्यातील लढाई कोण विसरू शकतो. Srk चा हा चित्रपट खूप प्रसिद्ध आहे. (Photo: Youtube) -
८. चाहत (Chaahat)
हा चित्रपट पूर्णपणे अॅक्शनवर आधारित नसला तरीही, क्लायमॅक्समध्ये रक्तरंजित संघर्ष दृश्य आहेत. (Photo: Youtube) -
९. अशोका (Asoka)
या ऐतिहासिक चित्रपटात शाहरुखने सम्राट अशोकाची भूमिका साकारली असून तलवारबाजीचे कौशल्य दाखवले आहे. (Photo: Youtube) -
१०. रा वन (Ra.One)
हा सुपरहिरो चित्रपट असून यामध्ये शाहरुखचा अॅक्शन अवतार पाहण्यासारखा आहे. हा शाहरुखचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण या चित्रपटाला म्हणावं तितकं यश मिळालं नाही. (Photo: Youtube) -
११. डॉन सिरीज (Don series)
डॉन आणि डॉन २ या दोन चित्रपटांत शाहरुखने चपळ आणि स्टायलिश डॉनची भूमिका साकारली असून हा चित्रपट त्याच्या वेगळ्या अॅक्शन आणि ड्रामा सीनसाठी प्रसिद्ध आहेत. (Photo: Youtube) -
याशिवाय अलीकडेच प्रदर्शित झालेले पठाण, जवान हे सर्व चित्रपट असे दाखवून देतात की शाहरुख खान नेहमीच विविध भूमिकांमध्ये उत्कृष्ट काम करतो.
हेही पाहा- Photos : नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर! लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलचं मराठमोळं दिवाळी सेलिब्रेशन
‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो