-
‘तेरे बिन जिया जाए ना’, ‘वंशज’ सारख्या मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री अंजली तत्रारी लोकप्रिय झाली.
-
अंजली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
ती तिचे फोटो, व्हिडीओ तिच्या अकाउंटवर पोस्ट करत असते.
-
आता अंजलीने तिच्या नव्या घराबद्दल केलेली पोस्ट चर्चेत आहे.
-
अंजलीने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे.
-
या घराची पूजा तिने आईबरोबर केली.
-
अंजलीने आईबरोबर धनत्रयोदशीला या गृहप्रवेश केला.
-
मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं श्रेय तिने आईला दिलं. तसेच अंजली बाबा व भावाच्या आठवणीत भावुक झाली.
-
अंजलीने लिहिलं, “काहींसाठी नवीन घर गरज, काहींसाठी अचिव्हमेंट, तर काहींसाठी स्वप्नं असतं. पण माझ्यासाठी या तिन्ही गोष्टी आहेत.”
-
“हे एक वचन होतं जे मी स्वतःला दिलं होतं. एकेदिवशी मुंबईत स्वतःचं घर असेल, जिथे मी माझ्या जवळच्या लोकांबरोबर राहीन, असा मी विचार केला होता,” असं अंजलीने लिहिलं.
-
“पण हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत माझे वडील व भाऊ मला सोडून गेले, मात्र आई कायम पाठिशी होती. आईच्या त्यागामुळेच आज मी हे करू शकले,” असं अंजलीने लिहिलं.
-
“आता माझ्याजवळ अशी एक हक्काची जागा आहे, जिथे मी सुख, दुःख, हसणं या भावनांसह जगेन,” असं अंजली म्हणाली.
-
अंजली अवघी १४ वर्षांची असताना तिच्या भावाचं व वडिलांचं निधन झालं.
-
आता २८ वर्षांच्या अंजलीने मायानगरी मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे.
-
(सर्व फोटो – अंजली तत्रारी इन्स्टाग्राम)
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई