-
मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने तिचे दिवाळी लूकमधील खास फोटो इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांहबरोबर शेअर केले आहेत.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘पिंजरा’ या मालिकेतून संस्कृतीने प्रसिद्धी मिळवली.
-
‘माकडाचं लगीन’ आणि ‘सर्व लाईन व्यस्त’ आहेत यांसारख्या अनेक सिनेमांमधुन प्रसिद्धी झोतात आली.
-
दरम्यान या फोटोंमध्ये संस्कृती सोनेरी किनार असलेली लाल साडी नेसलेली आहे.
-
साडीवरच्या दागिन्यांनी संस्कृतीचा हा लूक अधिक बहरून आला आहे.
-
संस्कृतीने फुलांच्या रांगोळीवर दिवे सजवताना फोटोसाठी पोज दिली आहे.
-
फुलं व तोरणांच्या सजावटीने या खास लूकच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडली आहे.
-
‘मन से जो रावण निकाले, राम उनके मन मे है’ असं कॅप्शन संस्कृतीने या पोस्टला दिलं आहे.
-
संस्कृतीच्या या खास लूकचे चाहत्यांनी मनापासून कौतुक करून तिलाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
”स्कॅम १९९२ – द हर्षद मेहता स्टोरी” फेम ‘शारीब हाश्मी’ ने संस्कृतीच्या पोस्ट वर राणी अशी कमेंट केली आहे. (सर्व फोटो सौजन्य- संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर