-
बॉलिवूडचा हॅण्डसम स्टार हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांच्यातील खास नाते अनेकदा चर्चेत असते. अलीकडे, सबा आझादच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त, हृतिकने त्याच्या प्रेयसीला खास फोटो आणि सुंदर कॅप्शनसह शुभेच्छा दिल्या. (Photo: @hrithikroshan/instagram)
-
१ नोव्हेंबर रोजी, सबाच्या वाढदिवशी, हृतिकने त्याच्या इंस्टाग्रामवर तिचे अनेक अनसीन आणि रोमँटिक फोटो शेअर केले, ज्यात या जोडप्याचे अतुलनीय प्रेम आणि डिप कनेक्शन दिसून आले. (Photo: @hrithikroshan/instagram)
-
या फोटोंमध्ये हृतिक आणि सबा खूप आनंदी दिसत आहेत. एका फोटोमध्ये हृतिक सबा मिठीत दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत दोघेही झाडाला मिठी मारताना दिसत आहेत. (Photo: @hrithikroshan/instagram)
-
या जोडप्याने या दिवसाचा पुरेपूर आनंद लुटला आणि सायकल चालवणे, खाणेपिणे यासारख्या गोष्टी देखील केल्या. एका फोटोमध्ये सबा मजेदार चेहरा करताना दिसत आहे, ज्याला पाहून हृतिक हसताना दिसत आहे. (Photo: @hrithikroshan/instagram)
-
दोघांनीही रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवण केले आणि सुट्टीचा आनंद लुटला. दरम्यान, एका छायाचित्रात सबा हिरव्या रंगाच्या ओव्हरकोटमध्ये उन्हात पोज देताना दिसली. (Photo: @hrithikroshan/instagram)
-
या फोटोंसोबत हृतिकने एक खास कॅप्शनही लिहिले आहे, “Happy Birthday Sa..
Thank you for you” या सुंदर संदेशासोबत त्याने हार्ट इमोजीही पोस्ट केले आहे. (Photo: @hrithikroshan/instagram) -
हृतिक आणि सबाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते या जोडप्याच्या नात्याचे कौतुक करत आहेत. (Photo: @hrithikroshan/instagram)
-
दरम्यान, बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि सबा आझाद काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. आता दोघांनीही त्यांच्या नात्याचा खुलेपणाने स्वीकार केला आहे आणि अनेकदा त्यांचे सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. (Photo: @hrithikroshan/instagram)
-
दोघांच्या वयात १२ वर्षांचा फरक असला तरी प्रेम हे वयाच्या मर्यादा ओलांडून जाते हे या जोडप्याने सिद्ध केले आहे. (Photo: @hrithikroshan/instagram)
-
हृतिकचे वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेत असते. त्याने २०१४ मध्ये पत्नी सुजैन खानला घटस्फोट दिला. आता तो सबा आझादसोबतच्या नात्यात खूप आनंदी दिसत आहे आणि आपल्या लेडी लव्हसोबत घालवलेले क्षण नेहमी मोकळेपणाने शेअर करताना दिसत आहे. (Photo: @hrithikroshan/instagram)
हेही पाहा- Photos : अभिनेत्री तृप्ती डिमरीचा लाल चुडीदारमधील सोज्वळ दिवाळी लूक, फोटो व्हायरल
“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक