-
जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या लग्नाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. जावेद अख्तर हे विवाहित आणि दोन मुलांचे वडील असूनही त्यांनी अभिनेत्री शबाना आझमींबरोबर दुसरे लग्न केले.
-
प्रसिद्ध लेखकाचे जवळचे मित्र, ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी त्यांच्या ताज्या मुलाखतीत शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या लग्नाबद्दलच्या रंजक आठवणी शेअर केल्या आहेत.
-
अन्नू कपूर यांनी सांगितले की, ते जावेद आणि शबाना आझमी यांच्या लग्नाच्या तयारीत सहभागी होते. याशिवाय अभिनेत्याने या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित अनेक रंजक खुलासेही केले आहेत. त्यांनी सांगितले की लग्नावेळी जावेद अत्यंत नशेच्या अवस्थेत होते.
-
एएनआयला दिलेल्या पॉडकास्टमध्ये अन्नू कपूर यांनी सांगितले की, त्यावेळी शबाना आझमीसोबत त्यांचे नाते खूपच गुंतागुंतीचे होते कारण लेखकाचे आधीच हनी इराणीशी लग्न झाले होते.
-
अन्नू कपूर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या लग्नाच्या रात्रीची आठवण करून सांगतात, “त्या रात्री जावेद नशेत होता. शबाना दुसऱ्या बाजूला बसून एक पुस्तक वाचत होती”
-
ते पुढे म्हणाले, “मी तिथे होतो आणि मी शबानाला म्हणालो, ‘बीबी, प्लीज हे आजच ठरवून टाका’, ज्यावर जावेद आश्चर्यचकित झाला. कारण तो कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हता.”
-
अन्नू कपूरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते जावेद अख्तर यांच्याकडे गेले आणि त्यांना उठवले तेव्हा ते म्हणाले, ‘हो, मी तयार आहे. यानंतर मी ड्रायव्हरसोबत वांद्रे येथील मशिदीत गेलो आणि मौलवींचा शोध सुरू केला. आम्ही एक मौलवी शोधून त्याला घरी आणले. – अन्नू कपूर
-
अभिनेते अन्नू कपूर यांनी पुढे सांगितले की, जेव्हा ते मौलवीला शोधण्यासाठी गेले होते, तोपर्यंत शौकत अम्मी यांनी शबाना आझमी यांच्यासाठी लाल जोडी काढून ठेवली होती. ही लग्नासाठी त्यांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत अगोदरच खरेदी केलेली होती.
-
त्यानंतर अनिल कपूर आणि बोनी कपूर यांना फोन केला केला गेला. अनिल कपूर, बोनी कपूर आणि अन्नू कपूर यांच्या उपस्थितीत शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचा त्यांच्या घरी विवाह संपन्न झाला. दोघांच्या लग्नानंतर जावेद अख्तर यांची मुले आणि त्यांची पहिली पत्नी हनी इराणी बराच काळ त्यांच्यावर रागावले होते. (Photos Source: Indian Express)
हेही पाहा – बांगलादेशातील हजारो हिंदू सुरक्षेसाठी रस्त्यावर; केली प्रचंड निदर्शने, पाहा Photo
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन