-
दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी अनेक लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. (फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)
-
त्यातील काही अभिनेत्यांबरोबर त्यांचे नाते चांगले असल्याचे पाहायला मिळते. (फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शबाना आझमी यांनी राजेश खन्ना आणि संजीव कुमार यांच्याबरोबरचे काही मजेदार किस्से सांगितले आहेत. (फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)
-
शबाना आझमी यांनी नुकतीच फेय डिसूजाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी संजीव कुमार यांच्याबरोबरचा एका संवादाची आठवण सांगितली. (फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)
-
त्यांनी म्हटले, “संजीव कुमार हे खूप विनोदी होते; मात्र ते तितकेच निर्दयी होते. (फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)
-
सगळ्यात भयानक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)
-
एकदा मी माझी नखं कापत होते, तेव्हा त्यांनी मला विचारले की, तू काय करत आहेस? (फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)
-
मी त्यांना म्हटले, “मी एक प्रामाणिक आणि कामाप्रति समर्पित अभिनेत्री आहे.
-
मला जी भूमिका मिळाली आहे, त्या भूमिकेसाठी मोठी नखं असणं गरजेचं नाही. त्यामुळे मी नखं कापत आहे. (फोटो सौजन्य: एक्स/ Bombay Basanti))
-
मला एखाद्या भूमिकेसाठी वजन वाढवायचं असेल किंवा बारीक व्हायचं असेल, तर तेदेखील मी करू शकते, हे तुम्ही पाहिले आहे. (फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)
-
त्यावर संजीव कुमार मला म्हणाले, “याच्याबरोबरच तुझ्याकडे प्रतिभा असती, तर बरं झालं असतं”, असं म्हणत मोठ्याने हसत निघून गेले. त्यांना खूप आनंद वाटत होता,” असे शबाना आझमी यांनी हसत सांगितले. (फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)
-
शबाना आझमी यांनी संजीव कुमार यांच्याबरोबर ‘राम तेरे कितने नाम’, ‘स्वर्ग नरक’, ‘देवता’ व अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘ही’ एक १० रूपयांची छोटी गोष्ट खरेदी केल्यानेही वाढेल सुख-समृद्धी