-
अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) तिच्या कुटुंबासह दिवाळी साजरी करतानाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ (Ranga Maza Vegala) आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Maatichya Chuli) या मालिकांमधून लोकप्रिय झाली.
-
पहिल्या फोटोमध्ये रेश्मा ही लक्ष्मी पूजनानिमित्त (Laxmi Pujan) प्रार्थना करताना दिसत आहे.
-
या फोटोमध्ये रेश्मा तिच्या संपूर्ण कुटुंबासह कॅन्डीड पोजमध्ये (Candid Pose) खूपच आनंदी दिसतेय.
-
दिवाळी लूकमध्ये रेश्माने निळ्या रंगाचा ड्रेस (Blue Dress) तसेच त्यावर फ्लोरल प्रिंट असलेली ओढणी (Floral print Dupatta) परिधान केली आहे. तसेच तिने यावेळी आकर्षक ज्वेलरी (Attractive Gold Jewellery) परिधान केली आहे. पाल्मोनास (Palmonas) या ब्रँडबरोबर रेश्माने व्यवयाय क्षेत्रातही पदार्पण केले आहे.
-
लाइटिंग आणि झेंडूच्या फुलांनी सजलेल्या घराबाहेरच्या अंगणात रेश्मासह कुटुंबाने फोटोसेशन केले आहे.
-
कुटुंबासह फटाके फ़ोडतानाचे व्हिडिओ देखील रेश्माने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
”जेव्हा कुटुंब एकत्र, तेव्हा दिवाळी हॅप्पी सर्वत्र.. दिवाळीत तुमच्या घरात नवीन सौंदर्य, उर्जा आणि हर्षोल्हास असो! शुभ दीपावली” असे कॅप्शन देत रेश्माने प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दरम्यान, सन मराठी वाहिनीवरील ‘नवी जन्मेन मी’ फेम अभिनेत्री सखी गांधी तसेच अभिनेत्री अनघा अतुलने रेश्माच्या पोस्टवर कौतुक करत कमेंट केली आहे.
(फोटो सौजन्य ; रेश्मा शिंदे/इंस्टाग्राम)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…