-
जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमापासून सूरज चव्हाणला आपला भाऊ मानलं आहे.
-
“भाऊबीजेला तुझ्या गावी नक्की येईन” असा शब्द जान्हवीने सूरजला दिला होता. अगदी त्यानुसार अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांसह सूरजच्या मोढवे गावी गेली होती.
-
सूरजने यावेळी जान्हवी, तिचे पती किरण किल्लेकर आणि मुलगा इशान यांना संपूर्ण गाव फिरवलं.
-
या सगळ्यांनी मिळून गावच्या मंदिरात देवदर्शन केलं.
-
यानंतर जान्हवी सूरजच्या घरी पोहोचली.
-
याठिकाणी अभिनेत्रीने आपल्या लाडक्या भावाचं भाऊबीजेनिमित्त औक्षण केलं.
-
भाऊबीज केल्यावर सूरज मोठ्या बहिणीच्या नात्याने जान्हवीच्या पाया पडला.
-
जान्हवीने हे फोटो शेअर करत याला, “भाऊबीज…तू फक्त एक हाक मार मी कायम तुझ्याबरोबर आहे” असं कॅप्शन दिलं आहे.
-
नेटकऱ्यांनी या भावा-बहिणीच्या नात्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर व सूरज चव्हाण इन्स्टाग्राम )

Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…