-
गायिका प्रिया पाटीदारने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे.
-
९ वर्षांच्या संसारानंतर ती पती अभिनेता मल्हार पंड्यापासून विभक्त झाली.
-
आता प्रियाने नवीन सुरुवात केली आहे.
-
प्रियाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करून तिच्या नवीन घराची झलक दाखवली.
-
धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर नवीन घरात गृह प्रवेश केला.
-
“कष्टाने कमावलेला पैसा अर्थपूर्ण गोष्टीत गुंतवण्यात एक वेगळाच आनंद आहे”, असं प्रिया म्हणाली.
-
प्रियाने तिच्या नवीन घरात दिवाळी साजरी केली.
-
तिच्याबरोबर तिची आईदेखील होती.
-
प्रियाचा भाऊ व आई तिच्या या आनंदात सहभागी झाले.
-
प्रियाचं मुंबईतील हे घर खूपच सुंदर आहे.
-
प्रियाने ‘दिल पटियाला,’ ‘बी माय लव्ह’, ‘इश्क विच झल्ली हो गई’, ‘आयेगी रे आयेगी’, ‘तसवीर,’ ही गाणी गायली आहे. तसेच तिने गुजराती, पंजाबी, बंगाली आणि मारवाडीमध्ये गाणी गायली आहेत.
-
“मला भूतकाळात रमायचं नाही. हे काहीतरी चांगलं करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. माझे लक्ष फक्त माझ्या कामावर आणि जीवनातील सकारात्मक गोष्टींवर आहे. माझा देव आणि माझ्या कर्मावर विश्वास आहे”, असं प्रिया इ-टाइम्सशी बोलताना म्हणाली.
-
मल्हार व प्रियाने २०१४ मध्ये लग्न केलं होतं, मात्र करोना काळात त्यांच्यात मतभेद झाले होते, नंतर ते वेगळे राहत होते. प्रियाने घटस्फोटाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं होतं.
-
मल्हार पंड्याने ‘हमारी सास लीला’, ‘देवों के देव…महादेव,’ ‘रामायण,’ ‘कसम तेरे प्यार की’, ‘कवच…काली शक्तियों से,’ ‘नागिन 2,’ ‘इश्कबाज,’ ‘नजर’, ‘राधा कृष्ण’ आणि ‘श्रीमद रामायण’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
(सर्व फोटो – प्रिया पाटीदार व मल्हार पंड्या इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख