-
विक्रांत मॅसी हे चित्रपटसृष्टीतील एक असे नाव बनले आहे ज्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. तो आपल्या साधेपणाने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रत्येक पात्रात जीव ओततो, मग ती ‘१२वी फेल’ चित्रपटातील मनोज शर्माची भूमिका असो किंवा ‘मिर्झापूर’मधील बबलू पंडितची भूमिका असो. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, चित्रपटांपूर्वी विक्रांतने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते आणि तिथूनच त्याने आपली छाप पाडण्यास सुरुवात केली. चला त्या टीव्ही मालिकांबद्दल जाणून घेऊया ज्यामध्ये विक्रांत मॅसीने अभिनय केला. (फोटो स्रोत: @vikrantmassey/instagram)
-
Ajab Gajab Ghar Jamai
‘अजब गजब घर जमाई’ या टीव्ही शोमध्ये त्याने राजेश्वर नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. (Photo Source: @vikrantmassey/instagram) -
Qubool Hai
विक्रांत मॅसीने ‘कुबूल है’मध्ये अयान अहमद खानची भूमिका साकारली होती. (Photo Source: @vikrantmassey/instagram) -
Gumrah: End of Innocence
‘गुमराह: एंड ऑफ इनोसन्स’ या मालिकेत त्याने शोहबित नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. (Photo Source: @vikrantmassey/instagram) -
Baba Aiso Varr Dhoondo
‘बाबा ऐसा वर ढुंढो’ या टीव्ही मालिकेत विक्रांतने मुरली लालची भूमिका साकारली होती.(Photo Source: @vikrantmassey/instagram) -
Balika Vadhu
भारतातील सर्वात प्रसिद्ध टीव्ही मालिकांपैकी एक असलेल्या ‘बालिका वधू’मध्ये विक्रांत श्याम सिंगची भूमिका साकारताना दिसला होता. (Photo Source: @vikrantmassey/instagram) -
Dharam Veer
विक्रांत मॅसीला त्याची सर्वात मोठी ओळख ‘धरम वीर’ या टीव्ही शोमधून मिळाली. या ऐतिहासिक शोमध्ये त्याने राजकुमार धरमची भूमिका साकारली होती. (Photo Source: @vikrantmassey/instagram) -
Dhoom Machaao Dhoom
विक्रांतने डिस्ने चॅनलच्या ‘धूम मचाओ धूम’ या शोमधून करिअरची सुरुवात केली. या शोमध्ये त्याने आमिर हसनची भूमिका साकारली होती. (Photo Source: @vikrantmassey/instagram)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?