-
सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
-
श्रिया पिळगांवकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “आजचा दिवस खास कारण-आज ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केले आहेत.
-
चित्रपटसृष्टीत ६१ वर्षे काम करत असताना माझ्या वडिलांनी दिग्दर्शन केलेला हा २१ वा चित्रपट आहे.हे कल्पना करण्यासाठी अद्भूत आहे.
-
यावेळी त्यांनी चित्रपट डिस्ट्रिब्यूट करण्याच्या निर्णय घेतला होता. सगळ्या संकटांनंतरही त्याच आवडीने, निर्धाराने, विश्वासाने काम करताना पाहणे हे प्रेरणादायी होते.”
-
“चित्रपट बनत असताना मला पापाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि वितरण देखील हाताळणे, हे सोपे नाही.
-
“तो खरोखरच वन-मॅन आर्मी आहे आणि खूप तणावपूर्ण दिवसांतही त्याच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असायचे. तो नेहमी म्हणायचा, “मला प्रत्येक गोष्ट आवडते. मला चांगले आव्हान आवडते”
-
“त्याचे पडद्यामागून निरीक्षण करून मी खूप काही शिकले आहे. मला साहजिकच या सिक्वेलचा भाग व्हायचं होतं.
-
त्यामुळे चित्रपटातील गणपतीच्या गाण्यातही कॅमिओ केला आहे.
-
आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दलदेखील आभार! गणपती बाप्पा आणि तुमच्या आशीर्वादाने हे घडू शकले आहे.”
-
“पापा, तुम्ही इंडस्ट्रीत ६१ वर्षे काम करत असलात तरी माझ्यावर विश्वास ठेवा, ही तर फक्त सुरुवात आहे, तुझ्यावर प्रेम आहे. तू प्रेमळ व्यक्तींपैकी एक आहे. रॉकस्टार मला तुझा गर्व वाटत आहे. गणपती बाप्पा मोरया”
-
‘नवरा माझा नवसाचा २’या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळाले.
-
चित्रपटात सचिन पिळगांवकर, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ यांच्याबरोबरच स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, निर्मिती सावंत, विजय पाटकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य: श्रिया पिळगांवकर)
![famous actress Parvati Nair got engaged to businessman Aashrith Ashok](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/famous-actress-Parvati-Nair-got-engaged-to-businessman-Aashrith-Ashok.jpg)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न