-
‘बिग बॉस मराठी ५’ या कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून अंकिताने सूरजला आपला भाऊ मानलं आहे. शो संपल्यावर तुझ्या गावी नक्की येईल असा शब्द अंकिताने सूरजला दिला होता.
-
अंकिताने शब्द दिल्याप्रमाणे ती खरंच सूरज चव्हाणच्या गावी बारामतीला गेली होती.
-
यावेळी कोकण हार्टेड गर्लबरोबर तिचा होणारा नवरा कुणाल देखील उपस्थित होता.
-
अंकिताने यावेळी सूरजच्या संपूर्ण कुटुंबीयांची भेट घेतली.
-
सूरजच्या बहिणींनी अंकितासाठी खास जेवणाचा बेत केला होता.
-
सूरजच्या मोढवे गावच्या शेतात बसून अंकिताने भाकरी अन् चटणीवर ताव मारला.
-
एवढंच नव्हे तर अंकिताने सूरजच्या बहिणीकडून ही चटणी कशी बनवायची याची रेसिपी देखील विचारली.
-
अंकिता आणि होणाऱ्या दाजींचा सूरजने मोठ्या प्रेमाने पाहुणचार केला. यावेळी अंकिताने सूरजच्या गावच्या देवीचं दर्शन देखील घेतलं.
-
या सगळ्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम )

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा