-
टीव्हीवरील काही प्रसिद्ध अभिनेत्यांनी प्रेम हे सर्वोच्च असते हे त्यांच्या कृतीतून सिद्ध केले आहे. या देखण्या कलाकारांनी चक्क स्वतः पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींवर प्रेम केले आणि लग्नही केले आहे. प्रेमाला कोणतही बंधन रोखू शकत नाही हे या कलाकारांकडे पाहून लक्षात येते. कृष्णा अभिषेकपासून ते हर्ष लिंबाचिया आणि इतर अनेक स्टार्स आहेत ज्यांनी वयाने मोठ्या स्त्रियांशी लग्न केले आहे, चला याबद्दल जाणून घेऊयात.
-
७ वर्षांनी मोठी आहे अर्चना पूरण सिंग
चार वर्षे डेट केल्यानंतर अर्चना पूरन सिंहने परमीतसोबत लग्न केले. ती त्याच्यापेक्षा ७ वर्षांनी मोठी आहे. -
करणवीर बोहरा दोन वर्षांनी लहान आहे
करणवीर बोहराही त्याच्या पत्नीपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. -
युविकापेक्षा प्रिन्स ७-८ वर्षांनी लहान
टीव्ही कपल प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी सलमान खानच्या रिॲलिटी शो बिग बॉसमध्ये भेटले आणि प्रेमात पडले. दोघांनी १२ ऑक्टोबर २०१८ रोजी लग्न केले. युविकापेक्षा प्रिन्स ७-८ वर्षांनी लहान आहे. -
सनाया इराणी तीन वर्षांनी मोठी
सनाया इराणी आणि मोहित सहगल ‘मिले जब हम तुम’ च्या सेटवर भेटले आणि २०१६ मध्ये प्रेमात पडले. रिपोर्ट्सनुसार, सनाया मोहितपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. -
सुगंधा मिश्रा चार वर्षांनी मोठी आहे
संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा हे आणखी एक कॉमेडियन जोडपे आहे. ज्यांचे २६ एप्रिल २०२१ रोजी लग्न झाले. संकेत सुगंधापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. -
भारती सिंग ३ वर्षांनी मोठी
लोकप्रिय कॉमेडियन जोडपे हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग एका कॉमेडी शोच्या सेटवर भेटले आणि ३ डिसेंबर २०१७ रोजी त्यांनी लग्न केले. भारती हर्षपेक्षा २-३ वर्षांनी मोठी आहे. -
माही विज २ वर्षांनी मोठी आहे
जय भानुशाली आणि माही विज एका कॉमन फ्रेंडद्वारे एका पार्टीत भेटले आणि नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांनी गुपचूप लग्न केले. जय माहीपेक्षा २ वर्षांनी लहान असल्याचं बोललं जातं. -
दोघांच्या वयात ११ वर्षांचे अंतर
कृष्णा अभिषेक हा ४१ वर्षांचा आहे, तर कश्मिरा शाह ५२ वर्षांची आहे. यामुळे दोघांच्या वयात ११ वर्षांचे अंतर आहे. कृष्णा आणि कश्मिरा यांची प्रेमकहाणी १८ वर्षांपूर्वी सुरू झाली होती, जेव्हा ते एकमेकांना डेट करत होते. त्यांनी काही वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१३ साली विवाह केला.
(Photos Source : Instagram)
हेहा पाहा- ‘Kapil Sharma Show’ मध्ये फक्त खुर्चीवर बसून हसायचे अर्चना पूरन सिंहला मिळतात तब्बल इतके पैसे, जगते आलिशान जीवन
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?