-
बोनी कपूर आज त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बोनी यांना चार मुलं आहेत. अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर त्यांच्या पहिल्या पत्नी मोना शौरी कपूरपासून तर जान्हवी कपूर आणि खुशी कपूर दुसऱ्या पत्नी श्रीदेवीपासून. त्यांच्या या खास दिवशी, त्यांच्या मुलांनी सोशल मीडियावर त्यांच्या अल्बममधील जुने फोटो शेअर केले आहेत, चला पाहूयात.
-
खुशी कपूरने तिचे वडील बोनी कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा जुना फोटो शेअर केला आहे. “Happy Birthday to the coolest Kapoor and the best Dad ever. love you papa,” असं कॅप्शन खुशीने या फोटोला दिलं आहे. (फोटो: खुशी कपूर/इन्स्टाग्राम)
-
खुशीने तिचाही वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. (फोटो: खुशी कपूर/इन्स्टाग्राम)
-
अंशुला कपूरनेही तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (फोटो: अंशुला कपूर/इन्स्टाग्राम)
-
अर्जुन कपूरने वडील बोनी आणि बहीण अंशुला कपूर यांच्यासोबतचा हा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले,”The picture says it all! Love you dad!” (फोटो: अर्जुन कपूर/इन्स्टाग्राम)
-
खुशी कपूरने बोनी कपूर आणि तिची आई श्रीदेवी यांचा हा खास जुना फोटो एकदा शेअर केला होता. (फोटो: खुशी कपूर/इन्स्टाग्राम)
-
बोनी कपूर यांच्या मागच्या वाढदिवशी जान्हवीने त्यांच्या कौटुंबिक अल्बममधील बरेच फोटो शेअर केले होते. (फोटो: जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)
-
जान्हवी कपूरने शेअर केलेला या फोटोमध्ये ती तिच्या आई आणि वडिलांसोबत दिसत आहे. हा तिच्या बालपणीचा फोटो आहे. (फोटो: जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य