-
या आठवड्यात शक्तिमानची (Shaktimaan) भूमिका साकारणारे मुकेश खन्ना (Mukesh Khanna) हे बरेच चर्चेत होते.
-
त्याचे झाले असे की त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर (YouTube Channel) शक्तिमान परत येत आहे (Arriving Soon) असा एक व्हिडीओ पोस्ट केला होता.
-
या व्हिडिओला पाहून शक्तिमानचे काही चाहते (Shaktimaan Fans) बरेच नाराज झाले. यावरून त्यांना ट्रोलही (Troll) करण्यात आलं. त्यामागे कारण होतं व्हिडीओतील खराब दर्जाचं VFX.
-
दरम्यान, फक्त हे एकमेव कारण नसून शक्तिमानचे चाहते शक्तिमान या चित्रपटाची (Shaktimaan Movie) वाट पाहत आहेत. याबद्दलची घोषणा मुकेश खन्ना यांनी याआधीच केलेली असताना त्यावर कोणतेही अपडेट न मिळाल्याने आणि अशा प्रकारे खराब दर्जाचे VFX असलेला व्हिडिओ आणल्याने फॅन्सची नाराजी मुकेश खन्ना यांच्यावर ओढावली.
-
मोठ्या प्रमाणात नकारात्मक केमंट्स त्यांच्या युट्यूब व्हिडिओवर आल्यानंतर त्यांनी कमेंट्स ऑप्शन बंद केला.
-
दरम्यान, काल त्यांनी पुन्हा एक व्हिडिओ चॅनलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये शक्तिमान परत कसा आला आहे हे स्पष्ट झाले आहे.
-
या व्हिडीओमध्ये (Shaktimaan Returns) मुकेश खन्ना शक्तिमानच्य रोलमध्ये पुन्हा एकदा दिसून येत आहेत.
-
या व्हिडिओत त्यांच्याबरोबर लहान लहान मुलांचाही सहभाग दाखवण्यात आला आहे.
-
त्यांनी या लुकमध्ये एक कविता सादर केली आहे. जी देशभक्ती आणि देशासाठी लढणाऱ्या थोर लोकांच्या आठवणींचा जागर करत आहे.
-
दरम्यान या व्हिडिओला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
-
दरम्यान, एनएनआय या वृत्तसंस्थेला बोलताना मुकेश खन्ना यांनी या व्हिडिओबद्दल भाष्य केलं आहे. हे गाणं त्यांनी स्वतः गायलं आहे, असं सांगताना त्यांनी कधी कोणाकडे काम मागितलं नाही, असेही ते म्हणाले आहेत. तसेच शक्तिमान चित्रपटात शक्तिमानचे पात्र (Shaktimaan Role) कोण साकारणार यावर भाष्य केलं आहे.
-
‘परदे मे रेहने दो, परदा ना उठाओ’, असं म्हणत त्यांनी चित्रपटात शक्तिमानची भूमिका कोण साकारणार यावर त्यांचं मत मांडलं आहे. दरम्यान चित्रपट कधी येणार? यावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं आहे.
-
(Photos Source: Bheeshm international Youtube channel/Indian Express/ANI/Mukesha khanna Instagram)
हेही पाहा – ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी स्वतःपेक्षा वयाने मोठ्या मुलींशी बांधली लग्नगाठ, एकजण तर बायकोपेक्षा तब्बल ११ वर्षांनी लहान
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”