-
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने नुकतेच साडीतील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात झळकली आहे.
-
सध्या चर्चेत असलेला चित्रपट भूल भुलैय्या ३ मध्येही माधुरी दीक्षित मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे.
-
या फोटोंमध्ये माधुरीने काळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
माधुरीच्या या लूकचे सौंदर्य सोनेरी रंगाच्या दागिन्यांनी अधिक खुलून गेले आहे.
-
काळ्या रंगाच्या या साडीवर माधुरीने गोल गळ्याचा ब्लॉउज परिधान केला आहे.
-
५७व्या वर्षीही माधुरीची अदा चाहत्यांना घायाळ करून टाकणारी आहे. या लूकमधील प्रत्येक फोटोमध्ये माधुरीची सुंदरता बहरुन आली आहे.
-
सोशल मीडियावर टाकलेल्या या पोस्टमध्ये ‘आमी जे तोमर ३.०’ या गाण्याचा समावेश आहे.
-
माधुरीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत.
(सर्व फोटो सौजन्य ; माधुरी दीक्षित / इंस्टाग्राम)