-
अभिनेता हिमांश कोहली काल लग्नबंधनात अडकला आहे.
-
तो “यारियां” चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आला.
-
बॉलीवूड अभिनेत्याने नुकतेच त्याचे मेहंदी सोहळ्याचे फोटो चाहत्यांसाठी इनस्टाग्रामवर शेअर केले होते.
-
त्याने काल १२ नोव्हेंबर २०२४ रोजी नवी दिल्लीतील एका मंदिरात गुपचूप विवाह केला आहे.
-
या लग्नाचा सोहळा खूप खासगी होता, ज्यामध्ये फक्त त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
-
लग्नानंतर हिमांश आणि त्याच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा देताना अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
हिमांशच्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध डिझायनर कुणाल रावलने डिझाइन केले आहेत.
-
लग्नाच्या सोहळ्यात हिमांशने गुलाबी रंगाची शेरवानी आणि पगडी घातली होती.
-
तर त्याच्या पत्नीने गुलाबी रंगाचा लेहेंगा आणि सोनेरी व गुलाबी रंगांचे मिश्रण असलेला सुंदर दुपट्टा परिधान केला होता.
-
दरम्यान, हिमांश कोहली आणि गायिका नेहा कक्कर चार वर्षे (२०१४ ते २०१८) रिलेशनशिपमध्ये होते.
-
त्यांच्या ब्रेकअपनंतर नेहा कक्करने रोहनप्रीतशी लग्न केले, तर हिमांशने सिनेसृष्टीपासून काही काळ दूर राहणे पसंत केले.
-
हिमांश कोहलीचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी राहिले नाही.
-
तो ‘बुंदी रायता’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये रवी किशन, राजेश शर्मा, सोनाली सहगल आणि शिल्पा शिंदे दिसणार आहेत.
-
(Photos Source : Himansh Kohli/ Instagram)
हेही पाहा- ‘शक्तिमान’ परत आला, ट्रोलही झाला; मुकेश खन्ना यांच्याबरोबर नेमकं घडलं काय?, चित्रपटात कोण साकारणार सुपरहिरोची भूमिका, म्हणाले…
IND vs AUS: “मी मारत होतो ना यार…”, राहुल विराटला बाद झालेलं पाहून त्याच्यावरच संतापला, मैदानातचं काय म्हणाला? पाहा VIDEO