-
अर्चना पूरन सिंह खूप चर्चेत असते. तिचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहेत.
-
तिच्या मोकळ्या हसण्यावरही खूप चर्चा होत असतात. अर्चना सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे.
-
गेल्या अनेक सीझनमध्ये ती कपिल शर्मासोबत आहे.
-
प्रेक्षकांना त्या दोघांची बॉन्डिंग आणि हलकी फुलकी छेडछाड खूप आवडते.
-
अनेक वेळा कपिल अर्चनाची खिल्ली उडवत म्हणत असतो की ती फक्त हसून करोडोंची कमाई करते, तर त्याला आणि इतर कलाकारांना त्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
-
दरम्यान, कपिलचे म्हणणे अगदीच खरे आहे.
-
अर्चना फक्त खुर्चीवर बसून हसून तब्बल ८ कोटी रुपये कमावते.
-
तिचे मानधन आणि कोट्यवधींची संपत्ती याबद्दल जाणून घेऊया.
-
कपिलच्या शोचा महत्त्वाचा भाग
अर्चना गेल्या काही वर्षांपासून कपिल शर्माच्या शोचा भाग आहे. -
नवज्योत सिंग सिद्धूंची जागा घेऊन तिने शोमध्ये कायमस्वरूपी तिचे स्थान निर्माण केले.
-
१० सेकंदाच्या भूमिकेपासून सुरुवात करून, चित्रपटांपासून OTT पर्यंत ओळख निर्माण केली.
-
अर्चनाने तिच्या करिअरची सुरुवात काही दशकांपूर्वी बी-ग्रेड चित्रपटातून केली होती. तिने साकारलेली पहिली भूमिका केवळ १० सेकंदांची होती, परंतु हळूहळू तिने चित्रपटांमध्ये तिचे स्थान पक्के केले.
-
आज, चित्रपटांव्यतिरिक्त तिने कॉमेडी शो आणि ओटीटीवर वर्चस्व गाजवले आहे.
-
कपिल शर्माच्या शोशिवाय अर्चनाची इथूनही कमाई
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधील एका एपिसोडसाठी अर्चना पूरण सिंगला 8 लाख रुपये फी मिळते. -
एका हंगामात ती 8 कोटी रुपये कमावते. याशिवाय ती चित्रपट, कॉमेडी शो आणि सोशल मीडियातूनही भरपूर कमाई करते.
-
एकूण संपत्ती २.३५ अब्ज रुपये
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चना पूरन सिंहची एकूण संपत्ती २३५ कोटी रुपये म्हणजेच २.३५ अब्ज रुपये आहे. -
आलिशान व्हिला, किंमत १२ कोटी रुपये
अर्चना राजेशाही थाटात राहते. मड आयलंडमध्ये तिचा आणि नवरा परमीतचा एक आलिशान व्हिला आहे, ज्याची किंमत १२ कोटी रुपये आहे. या व्हिलामधील सौंदर्य आणि सुखसोयी जबरदस्त आहेत. -
अर्चनाकडे कपिलपेक्षा महागड्या कार
अर्चनाकडे अनेक आलिशान गाड्या आहेत, ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. -
यामध्ये Mercedes-Benz E-Class, Audi A8, BMW X5, Jaguar F-Pace, Land Rover Range Rover Evoque आणि Porsche Panamera सारख्या गाड्यांचा समावेश आहे. अर्चनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्याकडे कपिल शर्मापेक्षा जास्त कार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य – अर्चना पूरन सिंह इन्स्टाग्राम)
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?