-
Psycho (1960)
हा अमेरिकन हॉरर मिस्ट्री चित्रपट अल्फ्रेड हिचकॉक यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘सायको’ मध्ये सस्पेन्स आणि भीतीचे खास मिश्रण आहे ज्यामुळे तो आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट हॉरर चित्रपटांपैकी एक बनतो. तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still from Film) -
The Shining (1980)
‘द शायनिंग’ हा एक सायकॉलॉजिकल हॉरर मिस्ट्री चित्रपट आहे जो एका हॉटेलमधील एका कुटुंबाची कथा मांडतो. हा चित्रपट भय आणि सस्पेन्स यांचे जबरदस्त मिश्रण आहे, जो तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still from Film) -
The Ring (2002)
‘द रिंग’ हा एक अमेरिकन सुपरनॅचरल भयपट आहे ज्यात एक विचित्र व्हिडिओ टेप पाहिल्यानंतर लोक मरायला लागतात. हा रहस्यपट JioCinema आणि Amazon Prime Video वर पाहता येईल. (Still from Film) -
The Conjuring (2013)
‘द कॉन्ज्युरिंग’ हा एक सुपरनॅचरल भयपट रहस्यपट आहे ज्यामध्ये पॅरानॉर्मल तज्ञांना घरात विचित्र घटनांचा तपास करताना राक्षसी शक्तींचा सामना करावा लागतो. हा चित्रपट पाहून तुमचा थरकाप उडेल. तुम्ही हा चित्रपट Netflix आणि Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still from Film) -
It Follows (2014)
‘इट फॉलो’ या अमेरिकन हॉरर मिस्ट्री फिल्ममध्ये एक भितीदायक शक्ती एका तरुण मुलीचा पाठलाग करते. हा चित्रपट सस्पेन्स आणि हॉररचा उत्तम मिलाफ आहे, जो प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. (Still from Film) -
The Witch (2015)
‘द विच’ हा एक फोक भयपट रहस्यपट आहे ज्यामध्ये एका कुटुंबाचा जंगलात राक्षसी शक्तींशी सामना होतो. हा चित्रपट सस्पेन्स आणि रहस्य्याचे उत्तम उदाहरण आहे. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. (Still from Film) -
Get Out (2017)
अमेरिकन सायकोलॉजिकल हॉरर कॉमेडी चित्रपट ‘गेट आऊट’ मध्ये एका आफ्रिकन-अमेरिकन मुलाचे जीवन चित्रित केले आहे, ज्यामध्ये त्याला काही भयानक अनुभवांना सामोरे जावे लागते. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. (Still from Film) -
Hereditary (2018)
अमेरिकन सायकोलॉजिकल हॉरर मिस्ट्री फिल्म ‘हेरिटरी’ एका कुटुंबाची कथा सांगते, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या पूर्वजांशी संबंधित काही विचित्र रहस्यांना सामोरे जावे लागते. तुम्ही हा चित्रपट Amazon Prime Video वर पाहू शकता. (Still from Film) -
Midsommar (2019)
‘मिडसोमर’ हा एक फोक भयपट रहस्यमय चित्रपट आहे ज्यामध्ये काही मित्र एका विचित्र उत्सवात सहभागी होतात. हळूहळू त्यांना कळते की तिथल्या चालीरीती खूप धोकादायक आहेत. तुम्ही ऍपल हा चित्रपट अॅपल टीव्हीवर पाहू शकता. (Still from Film)
हेही वाचा – ‘Kapil Sharma Show’ मध्ये फक्त खुर्चीवर बसून हसायचे अर्चना पूरन सिंहला मिळतात तब्बल इतके पैसे, जगते आलिशान जीवन

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…