-
टीव्ही अभिनेत्री श्रीजिता डे हिने १ वर्ष ४ महिन्यांनंतर पती मायकल ब्लोहम-पॅपसोबत पुन्हा लग्न केले आहे.
-
गेल्या वर्षी जर्मनीमध्ये या जोडप्याचे ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले होते.
-
आता लग्नाच्या जवळपास दीड वर्षानंतर बिग बॉस १६ फेम श्रीजिता डे पुन्हा नवरी बनली आहे.
-
यावेळी त्यांनी बंगाली रितीरिवाजानुसार गोव्यात लग्न केले आहे, लग्नाचे फोटोही आता समोर आले आहेत.
-
आता स्वतः श्रीजिता डेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिच्या लग्नाचे सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
एकीकडे मायकल पारंपारिक बंगाली पोशाखात दिसत आहे.
-
तर लाल बनारसी साडीत श्रीजिताही खूप सुंदर दिसत होती.
-
लाल साडी, डोक्यावर मुकुट, बंगाली मेकअप आणि भारी दागिने घातलेली ही अभिनेत्री बंगाली लग्नात खूपच सुंदर दिसत होती.
-
तिचा नवराही खूप छान दिसत आहे.
-
श्रीजीता आणि मायकल २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते.
-
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने २०२३ मध्ये ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले.
-
(सर्व फोटो सौजन्य- श्रीजिता डे इन्स्टाग्राम)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…