-
विक्रांत मॅसीचा चित्रपट ‘ द साबरमती रिपोर्ट ‘ १५ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आहे, जो २००२ साली गुजरातमधील गोध्रा घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. तुम्हाला वास्तविक घटनांवर आधारित चित्रपटांची आवड असेल, तर काही सिनेमे तुम्ही OTT वर पाहू शकता. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)
-
नीरजा
‘नीरजा’ हा सोनम कपूरचा दमदार चित्रपट आहे, जो नीरजा भानोटच्या जीवनावर आधारित आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नीरजाने विमान हायजॅक झाल्यावर शेकडो लोकांचे जीव वाचवले होते. डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
सरफिरा
अक्षय कुमारचा ‘सराफिरा’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट एका तरुणाची कथा आहे, जो आपल्या संघर्षातून आणि जिद्दीने आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
केसरी
अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा चित्रपट 1897 च्या सारागडीच्या युद्धावर आधारित आहे, जिथे 21 शीख सैनिकांनी 10,000 अफगाण सैनिकांचा सामना केला होता. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
सुपर 30
हृतिक रोशनचा चित्रपट ‘सुपर 30’ ही गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट Amazon Prime वर पाहता येईल. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
एअरलिफ्ट
अक्षय कुमारचा ‘एअरलिफ्ट’ हा चित्रपट कुवेतमध्ये इराकी हल्ल्यादरम्यान भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या मोहिमेवर आधारित आहे. हा चित्रपट जिओ सिनेमावर उपलब्ध आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
मांझी
‘मांझी’ हा चित्रपट दशरथ मांझीचा प्रेरणादायी प्रवास दाखवणारी खऱ्या आयुष्यातील कथा आहे. डोंगर फोडून त्यांनी रस्ता बनवला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
ओमेर्टा
राजकुमार रावचा ‘ओमेर्टा’ हा चित्रपट दहशतवादी अहमद उमर सईद शेखच्या जीवनावर आधारित आहे, ज्याने 1994 मध्ये पाकिस्तानी पत्रकार डॅनियल पर्लचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. हा चित्रपट Zee5 वर पाहता येईल.(चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
शेरशाह
‘शेरशाह’ हा सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट आहे, जो भारतीय सैनिक विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime वर पाहू शकता. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
उरी: सर्जिकल स्ट्राइक
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे आणि त्यात भारतीय लष्कराचे शौर्य दाखवण्यात आले आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं