-
बी-टाउनचे नवीन पालक रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी काल त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला आहे. या जोडप्याला अलीकडेच मुलगी झाली आहे, मुलीचे दुआ सिंग पदुकोण असे नाव त्यांनी ठेवले आहे. अशा प्रकारे हे वर्ष त्यांच्यासाठी अधिक खास आहे. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
हा दिवस साजरा करताना, पती रणवीर सिंगने त्याची अभिनेत्री-पत्नी दीपिकाचे खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
८ सप्टेंबरला दुआचा जन्म झाला तेव्हापासून दीपिका लाइमलाइटपासून दूर आहे. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ८ नोव्हेंबरला मुंबईच्या खाजगी विमानतळावर त्यांची मुलगी दुआ पदुकोण सिंगसोबत दिसले होते जेव्हा ते एकत्र सुट्टीसाठी निघाले होते. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
रणवीरची ही पोस्ट चाहत्यांसाठी एक ट्रीट आहे कारण त्याने दीपिकाचे गेल्या वर्षांतील अनेक न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
“Every day is Wife Appreciation Day, but today is the main day #HappyAnniversary @deepikapadukone I love you” असं कॅप्शन रणवीरने या पोस्टला दिलं आहे. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, दीपिका पदुकोणने एक मजेदार व्हिडीओ क्लिप शेअर केली आणि त्यावरील मजकूर असा आहे की, “Me immediately crawling to my husbands side of the bed as soon as he leaves for work to get the best sleep ever since it’s warmer, more comfortable and smells like him.” दीपिकाने रणवीरला टॅग करत “Happy Anniversary!,” असे कॅप्शन दिले आहे. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
रणवीरच्या या पोस्टमध्ये दीपिकाचे काही स्पेशल जुने फोटो पाहायला मिळाले आहेत. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
रणवीरने एक हा फोटो देखील शेअर केला आहे जिथे तो दीपिकाचे तिच्या २०१५ मधील पिकू चित्रपटातील गाणे टेलिव्हिजनवर पाहत आहे. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
या जोडप्याची प्रेमकहाणी गोलियों की रासलीला राम-लीलाच्या सेटवर सुरू झाली. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
दीपिका आणि रणवीरचे इटलीतील लेक कोमो येथे २०१८ मध्ये कोकणी रितीरीवाजानुसार लग्न झाले होते. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
-
रणवीरच्या पोस्टमधील शेवटचा फोटो जास्त खास आहे कारण त्यात दीपिका तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये खूप आनंदी दिसत आहे. (फोटो: रणवीर सिंग/इन्स्टाग्राम)
हेहा पाहा – पुष्पाच्या श्रीवल्लीने शेअर केल्या पार्ट वनच्या सेटवरील आठवणी, पाहा Unseen Photos
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”