-
पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान डेट करत असल्याच्या अफवा आधीपासूनच आहेत. (Photo: Palak Tiwari/Instagram)
-
आणि आता दोघांनीही एकाच ठिकाणाहून फोटो शेअर केले आहेत. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
त्यामुळे पुन्हा एकदा ते नेटकऱ्यांच्या चर्चेत आले आहेत. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने तिचे नवे फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (Photo: Palak Tiwari/Instagram)
-
पलकने तिच्या मालदीवच्या सुट्टीची झलक दाखवली आहे. यामध्ये ती फ्लोटिंग ब्रेकफास्ट करताना, पाण्याखाली डायव्ह्ज करताना आणि कँडललाइट डिनर करताना दिसतेय. (Photo: Palak Tiwari/Instagram)
-
त्याचवेळी बॉलीवूड स्टार सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिमनेही त्याच्या मालदीवच्या सुट्टीतील फोटो पोस्ट केले आहेत. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
त्यामुळे पलक आणि इब्राहिम हे दोघे एकमेकांबरोबर ही सुट्टी घालवत असल्याचा नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
तशा प्रतिक्रिया दोघांच्याही पोस्टवर पाहायला मिळत आहेत. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
पलक आणि इब्राहिम या दोघांच्याही फोटोंमधील बॅकग्राऊंड एकच असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. (Photo: Palak Tiwari/Instagram)
-
इब्राहिमच्या एका फोटोमध्ये तो कँडललाइट डिनर सेटअपसमोर आहे, ज्यावरुन चाहत्यांचा दावा आहे की ते समुद्रकिनारी रोमँटिक डिनर डेट करत आहे. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
या फोटोंवर कमेंट करताना एका चाहत्याने म्हटले- “पलक तुझे फोटो काढतेय, व्वा.”, दुसरा म्हणाला- “ते काही लपवण्याचा प्रयत्नही करत नाहीयत.” तिसरा चाहता म्हणाला- “याचा अर्थ तू पलकला डेट करत आहेस.” (Photo: Palak Tiwari/Instagram)
-
हे दोन्ही स्टार किड्स बॉलिवूडची नवी पिढी आहेत. याआधीही सोशल मीडियावरुन लोकांनी त्यांना एकमेकांशी जोडले आहे. (Photo: Palak Tiwari/Instagram)
-
सलमान खानच्या २०२३ मधील ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून पलकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिने झपाट्याने लोकप्रियता मिळवली आहे. (Photo: Palak Tiwari/Instagram)
हेही पाहा- Photos : रणवीर सिंगने लग्नाच्या सहाव्या वाढदिवशी दीपिका पदुकोणचे Unseen Photo केले शेअर
IND vs AUS: “मी मारत होतो ना यार…”, राहुल विराटला बाद झालेलं पाहून त्याच्यावरच संतापला, मैदानातचं काय म्हणाला? पाहा VIDEO