-
अलीकडच्या काही महिन्यांत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्याबद्दल अफवा उडत आहेत की दोघे घटस्फोट घेणार आहेत. मात्र, या जोडप्याने या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Photo: Indian Express)
-
ऐश्वर्या जशी बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे तसेच अभिषेक देखील एक उत्कृष्ट अभिनेता आहे. चला तर मग जाणून घेऊया या दोघांमध्ये कोण सर्वात श्रीमंत आहे आणि कोणाकडे किती प्रॉपर्टी आहे? (Photo: Indian Express)
-
ऐश्वर्या रायच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार ती ८५० कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे आणि ती बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती एका चित्रपटासाठी १० ते १२ कोटी रुपये मानधन घेते. (Photo: Indian Express)
-
याशिवाय ऐश्वर्याकडे अनेक मौल्यवान वस्तू आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. अभिनेत्रीचे दुबईतील जुमेराह गोल्फ इस्टेटमध्ये १५ कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. तसेच, मुंबईतील वांद्रे भागात एक आलिशान ५ बीएचके बंगला आहे, ज्याची किंमत २१ कोटी रुपये आहे. हा बंगला ५,५०९ स्क्वेअर फूटपेक्षा जास्त परिसरात बांधलेला आहे. (Photo: Indian Express)
-
याशिवाय ऐश्वर्याकडे ६.९५ कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट, १.३४ कोटी रुपयांची ऑडी A8L, १.९८ कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ S500 आहे. मर्सिडीज बेंझ S350 कूप जी १.६० कोटी रुपये आणि लेक्सस LX 570 जीची किंमत २.८४ कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कलेक्शनमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. (Photo: Indian Express)
-
दरम्यान, ऐश्वर्याने तिच्या आणि अभिषेकच्या लग्नात खूप महागडी साडी घातली होती, जी नीता लुल्ला यांनी डिझाइन केली होती आणि सोन्याच्या धाग्यांचे भरतकाम केलेली साडी होती तिची किंमत ७५ लाख रुपये होती. (Photo: Indian Express)
-
अभिषेक बच्चनबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार त्याची एकूण संपत्ती २८० कोटी रुपये आहे आणि तो एका चित्रपटासाठी १० ते १२ कोटी रुपये मानधन घेतो. (Photo: Indian Express)
-
अलीकडेच, अभिषेकने वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत मुलुंड, मुंबई येथे २४.९५ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. यापूर्वी त्याने मुंबईतील बोरिवली येथे १५ कोटी रुपयांचे फ्लॅटही खरेदी केले होते. याशिवाय तो चित्रपट, वेब सिरीज, रिअल इस्टेट, क्रीडा आणि इतर अनेक व्यवसायातून कमाई करतो. (Photo: Indian Express)
-
त्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्याकडे बेंटले कॉन्टिनेंटल जीटी (किंमत ३.२९ कोटी), ऑडी A8L (किंमत १.५० कोटी), आणि GL63 AMG आणि S-क्लाससह अनेक मर्सिडीज-बेंझ मॉडेल्स आहेत. त्यामुळे ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनपेक्षाही श्रीमंत आहे. ऐश्वर्या ८५० कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. तर, अभिषेकची एकूण संपत्ती २८० कोटी रुपये आहे. (Photo: Indian Express)
हेही पाहा – भारतातील ‘या’ राज्यात आतापर्यंत ट्रेन धावली नाही; इथे एकही रेल्वे स्टेशन नाही, कारण काय?
![pm narendra modi on amit shah dr babasaheb ambedkar congress](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/12/pm-narendra-modi-on-amit-shah-dr-babasaheb-ambedkar-congress.jpg?w=300&h=200&crop=1)
अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर; डॉ. आंबेडकरांविषयीच्या विधानावरून विरोधकांवर हल्लाबोल!