-
अभिनय, सौंदर्य, नृत्य, नजाकत याच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवणाऱ्या म्हणजे अभिनेत्री रेखा.
-
मीनाकुमारी, वैजयंती माला, वहिदा रेहमान, आशा पारेख, शर्मिला टागोर, सायरा बानू, मुमताज यांचा वारसा त्यांनी दोन पावलं पुढे नेला.
-
हेमा मालिनी, लीना चंदावरकर, साधना अशा लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं शिवधनुष्य रेखा यांनी लीलया पेललं.
-
रेखा यांनी अत्यंत वेग-वेगळ्या वळणा-वळणांचा प्रवास, आव्हानांचा डोंगर अन् अपेक्षाभंगाची खोल दरी पार केली.
-
बिनधास्त, बेधडक, रोखठोक असा स्वभाव असणाऱ्या रेखा आता ७० वर्षांच्या झाल्या आहेत.
-
वयाच्या सत्तरीतही रेखा आपल्या हटके लूक, स्टाइलने सगळ्यांना घायाळ करत असतात.
-
प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने नुकतेच सोशल मीडियावर रेखा यांचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
मनिष मल्होत्राने शेअर केलेल्या फोटोंमध्ये रेखा काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत.
-
रेखा यांच्या या नव्या लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य – मनिष मल्होत्रा इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”