-
कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेक यांची प्रेमकथा बॉलिवूडमध्ये सर्वात जास्च चर्चीली जाते. या दोघांनी त्यांच्या नात्याची सुरुवात कशी केली, त्यांचे वैयक्तिक आयुष्य, आणि त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.
-
कश्मीरा आणि कृष्णाची पहिली भेट २००५ मध्ये जयपूरमध्ये ‘और पप्पू पास हो गया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली.
-
सुरुवातीला ते दोघेही फक्त मित्र होते. कश्मीराने एकदा कृष्णाला डिनरसाठी आमंत्रित केले आणि त्यांनी रात्रीभर गप्पा केल्या. या संवादामुळे त्यांच्यातील मैत्री अधिक वाढली.
-
या पहिल्या भेटीनंतर कश्मीरा आणि कृष्णा यांच्यातील नाते हळूहळू प्रेमात बदलले.
-
कश्मीराने २००७ मध्ये तिचा पहिला पती ब्रॅड लिस्टरमनला घटस्फोट दिला, त्यांतर तिचे आणि कृष्णाचे प्रेम सर्वांसमोर आले.
-
दरम्यान, अनेकांनी तर्क केला की कश्मीराचा घटस्फोट कृष्णामुळे झाला, परंतु कश्मीराने याला नकार दिला.
-
कश्मीरा आणि कृष्णा यांनी २०१३ मध्ये लग्न केले. त्यांच्या विवाहानंतर त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. हे दोघे आता एकत्र आनंदी जीवन जगत आहेत.
-
कश्मीरा शाह ही कृष्णा अभिषेकपेक्षा वयाने मोठी आहे, कश्मीराचे वय ५२ वर्षे आहे तर कृष्णाचे ४१ वर्षे आहे.
-
या वयानुसार त्यांच्यात ११ वर्षांचे अंतर आहे, तरीही त्यांच्या प्रेमात कोणतीही अडचण आली नाही. यंदा त्यांना लग्न करून १८ वर्ष झाली आहेत.

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’