-
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
यावर्षी मार्च महिन्यात मृणाल आपला पती नीरज मोरे आणि लेक नुर्वी यांच्याबरोबर ४ वर्षांनी भारतात परतली.
-
भारतात आल्यावर मृणालने आपल्या नवऱ्याच्या साथीने नवा व्यवसाय सुरू केला आहे. तिने हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
-
मृणालने ठाण्यात ‘बेली लाफ्स’ ( Belly Laughs ) हे तिचं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं असून नुकताच या हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला.
-
यानिमित्ताने तिच्या हॉटेलला भेट देण्यासाठी मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकार पोहोचले होते.
-
आपलं पोट भरलं, जेवून आपण तृप्त झालो की सगळ्या गोष्टी छान होतात. असा विचार करून आम्ही आमच्या रेस्टॉरंटला Belly Laughs Bistro & Tap असं नाव दिल्याचं यावेळी मृणालने सांगितलं.
-
मृणाल व नीरज या दोघांनी इंटिरियर डिझायनरच्या मदतीने त्यांचं संपूर्ण हॉटेल व्हिंटेज लूकमध्ये सजवलं आहे.
-
प्रशस्त जागा, पदार्थांना इराणी टच, लक्षवेधी इंटिरियर यामुळे अभिनेत्रीच्या रेस्टॉरंटमध्ये एक सुंदर Vibe तयार होत असल्याचं फोटो पाहून लक्षात येतं.
-
आता मृणाल मालिकांमध्ये काम करून आपल्या नवऱ्याच्या साथीने हा नवीन व्यवसाय सांभाळणार आहे. ( फोटो सौजन्य : मृणाल दुसानिस व नीरज मोरे यांचं अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट )
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…