-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
-
गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा ३० नोव्हेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
-
मालिका ऑफ होत असल्यामुळे ‘आई कुठे काय करते’मधील कलाकार आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
-
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रुपाली भोसलेने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी रुपालीला मालिका संपल्यानंतर कोणाची आठवण येईल? असं विचारलं.
-
तेव्हा रुपाली म्हणाली, “याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. कधी ते लपलेलं नाही. अरुंधतीबरोबर ऑफ कॅमेरा जे काही असेल तरी तितके आम्ही दररोज नसतो. तिचे जेव्हा केळकर घरात सीन असायचे तेव्हा ती दुसऱ्या ठिकाणी असायची.”
-
पुढे रुपाली भोसले म्हणाली, “समृद्धी बंगल्यावर मारामारीचे, वादविवादाचे सीन असतात. त्यामुळे आम्ही बसून खूप गप्पा मारल्या नाहीयेत. तो सीन झाल्यानंतर आम्ही दोघींपण अशा जरा थांब, स्पेस आउट, असं म्हणून बाजूला व्हायचो.”
-
“या सेटवरच्या एका व्यक्तीला मीस करायचं म्हटलं तर मिलिंद गवळी सर आहेत. म्हणजे अनिरुद्ध देशमुख. त्यांच्याशी जितक्या गप्पा झाल्यात, त्यांच्याशी जितकी विचारांची देवाणघेवाण झालीये. एकंदरीत सगळ्याचं पातळीवर,” असं रुपालीने सांगितलं.
-
रुपाली म्हणाली की, भावनिक, मानसिक, प्रोफेशनल, पर्सनल, जेवढ्या सगळ्या त्यांच्याबरोबर गोष्टी शेअर झाल्यात. तितक्या इथे कोणाबरोबर शेअर केल्या, असं मला वाटतं नाही.
-
पुढे रुपाली भोसले म्हणाली, “एक गौरी होती. गौरीनंतर मिलिंद सर आहेत. माझ्या मते त्यांची जास्त आठवण येईल. बाकी नाही. मला नाही वाटतं, मला इतर कोणाची आठवण येईल.”
-
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे.
-
२ डिसेंबरपासून दुपारी २.३० ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका सुरू होणार आहे.
-
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ( सगळे फोटो सौजन्य – स्टार प्रवाह आणि रुपाली भोसले इन्स्टाग्राम )

स्वारगेट बलात्कार प्रकरण : बस स्थानकातील सीसीटीव्हींबाबत महत्त्वाची माहिती, कॅमेऱ्यांचा रोख प्रवाशांऐवजी…