-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिका बंद होऊन वर्ष ओलांडलं आहे. तरीही या मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात.
-
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकार आता वेगवेगळ्या मालिकांमध्ये नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
नुकतेच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकार एकत्र पाहायला मिळाले. याच निमित्त देखील खूप खास होतं.
-
लवकरच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे या अभिनेत्रीचं केळवण करण्यासाठी मालिकेतील कलाकार एकत्र पाहायला मिळाले.
-
लवकरच बोहल्यावर चढणारी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. तिच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत.
-
नुकतेच रेश्माने सोशल मीडियावर केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.
-
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”, असं कॅप्शन लिहित रेश्माने केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.
-
केळवणासाठी अभिनेत्रीने खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या साडीवर तिने हिरव्या रंगाचा सुंदर नेकलेस घातला होता.
-
अभिनेत्रीच्या केळवणासाठी खास फुलांची सजावट, पंचपक्वान्न करण्यात आलं होतं. भजी, आलू वडी, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, कारळ्याचे काप, कोशिंबीर, पोळी, भात, तूप, शेवयाची खीर, गुलाब जामुन, रस-मलाई, जिलेबी, आइस्क्रीम असे गोड-धोडचे पदार्थ रेश्माच्या केळवणासाठी खास करण्यात आले होते.
-
तसंच रेश्माला आहेर म्हणून हिरव्या बांगड्या, साडी, गजरा अशा सौभाग्याच्या वस्तू देण्यात आल्या.
-
केळवणाच्या वेळी केक वगैरे कापूनही सेलिब्रेशन करण्यात आलं.
-
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकारांसह सुयश टिळक, ऋतुजा बागवे, मृणाल देशपांडे यांनीदेखील रेश्माच्या केळवणाला खास उपस्थिती लावली होती.
-
रेश्मा शिंदेच्या केळवणाचे फोटो पाहून चाहत्यांचा सुखद धक्का बसला आहे.
-
तिच्या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसंच “नवरा कोण आहे?”, असं चाहत्यांकडून विचारलं जात आहे.
-
( सर्व फोटो सौजन्य – रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम )

स्वारगेट बलात्कार प्रकरण : बस स्थानकातील सीसीटीव्हींबाबत महत्त्वाची माहिती, कॅमेऱ्यांचा रोख प्रवाशांऐवजी…