-
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज २२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा १५ वा वाढदिवस आहे. दरम्यान यावेळी अभिनेत्रीने तिला राज कुंद्राने लग्नाबाबत अल्टिमेटम दिल्याच्या गोष्टीबद्दल सांगितले होते, ज्यामुळे, तिला तिच्या करिअरच्या शिखरावर असताना आणि यशस्वी असताना लग्न करावे लागले होते. राज कुंद्राने शिल्पाला एकतर माझ्याशी लग्न कर नाहीतर नाते संपवण्यास सांगितले होते.
-
शिल्पा शेट्टीने एकदा ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की तिने वयाच्या १७ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली आणि वयाच्या ३२ व्या वर्षी लग्न केले. लग्न करण्याचे कारण सांगताना अभिनेत्री म्हणाली की, त्या वयात तिलाही वाटू लागले होते की ती लग्नासाठी तयार होती आणि तिला मूलही हवे होते.
-
दरम्यान, यशस्वी कारकिर्दीच्या शिखरावर असताना लग्न केल्याबद्दल तिला कोणताही पश्चाताप नसल्याचे, त्याचवेळी तिला तिची ओळख आणि स्वातंत्र्यही जपायचे होते, असेही शिल्पाने सांगितले होते. दरम्यान, याच मुलाखतीत सनी देओलसोबत ‘द मॅन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राज कुंद्राने तिला लग्नाबाबत अल्टिमेटम दिल्याबद्दलही शिल्पाने सांगितले होते.
-
राज कुंद्राने शिल्पाला एकतर माझ्याशी लग्न कर किंवा नाते संपव असे सांगितले होते. मग शिल्पाने ‘द मॅन’ चित्रपट नाकारून राज कुंद्राची निवड केली आणि लग्न केले. शिल्पाने हा निर्णय तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय असल्याचे म्हटले होते. कारण नंतर सनी देओलने ‘द मॅन’ चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
-
तेव्हा शिल्पाने गंमतीने सांगितले की, जर तिने राज कुंद्रा ऐवजी चित्रपट करण्याची निवड केली असती तर आज ती पार्लरमध्ये बसून केस रंगवत असती. मग राज कुंद्राही तिच्या आयुष्यात आला नसता.
-
त्याचवेळी, शिल्पाने हेही सांगितले होते की तिला ब्रिटीश टीव्ही मालिका EastEnders ची ऑफर देखील आली होती आणि लंडनमध्ये स्थायिक होण्याची संधी होती, परंतु तिने लग्न करून तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यास प्राधान्य दिले.
-
शिल्पाने ती आधुनिक विचारांची असल्याचेही सांगितले होते. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे आणि लग्नाशिवाय मूल होणे याबद्दल तिला कोणतीही अडचण नव्हती, परंतु तिच्या आईच्या आदरापोटी तिने लग्नासाठी पारंपरिक मार्ग निवडला.
-
शिल्पा म्हणाली की तिची आई लग्नाला खूप महत्त्व देते आणि म्हणूनच तिने पारंपरिक पद्धतीने भारतीय रितीरिवाजांनुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
-
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा २२ नोव्हेंबर २००९ रोजी विवाहबद्ध झाले. त्यांना एक मुलगा विआन आणि मुलगी समिशा आहे. अभिनयासोबतच शिल्पा अनेक व्यवसायही करते. (सर्व फोटो साभार- शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम)
हेही पाहा – Photos : श्रीवल्लीचा साडीमधील ग्लॅमरस लूक पाहिलाय का? रश्मिकाचे नवे फोटो व्हायरल

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल