-
दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पुष्पा 2: द रुल’ची जोरदार चर्चा आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Still From Film)
-
अल्लू अर्जुन स्टारर हा चित्रपट ६ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Still From Film)
-
‘पुष्पा १: द राइज’च्या यशानंतर या सिक्वलकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. या सगळ्यांमध्ये या चित्रपटाची स्टारकास्ट, त्यांची फी आणि बजेट याविषयी चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. (Still From Film)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट ४००-५०० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे आणि रिलीज होण्याआधीच, त्याने नॉन-थिएट्रिकल राइट्स (जसे की OTT, सॅटेलाइट आणि म्युझिक राइट्स) पासून १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटासाठी ‘पुष्पा २’ च्या स्टार कास्टने किती फीस घेतली आहे ते जाणून घेऊया. (Still From Film)
-
अल्लू अर्जुन
या चित्रपटात पुष्पा राजची भूमिका साकारणारा आयकॉन स्टार अल्लू अर्जुनने त्याच्या भूमिकेसाठी रेकॉर्डब्रेक फी आकारली आहे. रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २’साठी ३०० कोटी रुपये चार्ज केले आहेत. या रकमेने उद्योगक्षेत्रात नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. (Still From Film) -
रश्मिका मंदान्ना
या चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारणारी रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाने या चित्रपटासाठी १० कोटी रुपये फी घेतली आहे. (Still From Film) -
फहद फासिल
या चित्रपटात खलनायक एसपी भंवर सिंगची भूमिका साकारणाऱ्या फहाद फासिल, ज्याला ‘फाफा’ म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या मागील चित्रपटात त्याच्या दमदार अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळाली होती. यावेळी फहादने ‘पुष्पा २’साठी ८ कोटी रुपये फी घेतली आहे. (Still From Film) -
श्रीलीला
श्रीलीलाने ‘पुष्पा २’ मधील एका खास गाण्यासाठी परफॉर्म केले आहे. रिपोर्ट्सनुसार, तिला या गेस्ट अपिअरन्ससाठी २ कोटी रुपये फी देण्यात आली आहे. (Still From Film)

विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?