-
November OTT Release List: नोव्हेंबरचा हा शेवटचा आठवडा आहे. या आठवड्यात ओटीटीवर नवीन कोणत्या कलाकृती रिलीज होणार आहेत, ते जाणून घेऊयात.
-
Our Little Secret
रिलीज डेट: 27 नवंबर
ओटीटी प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
हा एक मनोरंजक ख्रिसमस-थीम असलेला चित्रपट आहे ज्यामध्ये ब्रेकअप झालेल्या दोन प्रेमींना कळतं की त्यांचे पार्टनर्स भाऊ आणि बहीण आहेत. यामुळे त्यांना एकाच घरात ख्रिसमस साजरा करण्यास भाग पाडले जाते आणि त्यांची जुनी प्रेमकथा देखील लपवावी लागते. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
सिकंदर का मुकद्दर
रिलीज डेट: 29 नोव्हेंबर
ओटीटी प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
हा हिंदी चित्रपट आहे. एका हिऱ्याच्या चोरीभोवती फिरणारी ही कथा आहे. मुख्य संशयिताचा पाठलाग करताना एक पोलीस अधिकारी काय करतो, ते यात पाहायला मिळेल. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
The Madness
रिलीज डेट: 28 नोव्हेंबर
ओटीटी प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
अमेरिकन कॉन्स्पायरेसी थ्रिलर सीरिज ‘द मॅडनेस’ ही मीडिया पंडित मन्सी डॅनियलची कथा आहे. तो एका खुनाच्या प्रकरणात अडकतो, त्यानंतर काय घडतं ते यात पाहायला मिळेल. (सीरिजमधून स्क्रीनशॉट) -
Bloody Beggar
रिलीज डेट: २९ नोव्हेंबर
ओटीटी प्लॅटफॉर्म: प्राइम व्हिडीओ
तमिळ चित्रपट ‘ब्लडी बेगर’ ही एक अनोखी कथा आहे, जी भिकाऱ्याच्या आयुष्यातील चढ-उतार दाखवते. हा चित्रपट जीवनातील संघर्ष आणि अपेक्षा यांचे मार्मिक चित्रण करतो. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
पॅराशूट
रिलीज डेट: 29 नोव्हेंबर
ओटीटी प्लॅटफॉर्म: Disney+Hostar
तमिळ वेब सीरिज ‘पॅराशूट’ची कथा घरातून पळून जाणाऱ्या दोन मुलांभोवती फिरते. त्यांचे पालक त्यांना शोधण्यासाठी धडपडत असतात. ही मालिका नातेसंबंध आणि भावनांवर आधारित आहे. (सीरिजमधून स्क्रीनशॉट) -
Divorce Ke Liye Kuch Bhi Karega
रिलीज डेट: 29 नोव्हेंबर
ओटीटी प्लॅटफॉर्म: G5
ही कॉमेडी वेब सिरीज दोन पत्रकारांची कथा आहे जे एका स्ट्रिंग ऑपरेशननंतर मनोरंजक परिस्थितीत अडकतात. विनोदी सीरिज प्रेक्षकांना खळखळून हसवेल. (सीरिजमधून स्क्रीनशॉट) -
Woman of the Hour
रिलीज डेट: 29 नोव्हेंबर
ओटीटी प्लॅटफॉर्म: लायन्सगेट प्ले
1970 च्या दशकावर आधारित, हा चित्रपट एका महत्त्वाकांक्षी अभिनेत्रीची कथा आहे जी प्रेमाच्या शोधात डेटिंग शोमध्ये जाते. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
The Trunk
रिलीज डेट: 29 नोव्हेंबर
ओटीटी प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
हा कोरियन ड्रामा आहे, जो तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. (सीरिजमधून स्क्रीनशॉट)

Indian Man : “प्रामाणिकपणाचं फळ! माझा व्हिसा ४० सेकंदात नाकारला आणि अमेरिकेला…”; भारतीय नागरिकाची पोस्ट चर्चेत