-
मुंबईत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात १६६ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. मुंबईत हा हल्ला १६ वर्षांपूर्वी याच दिवशी झाला होता. या हल्ल्यामुळे मायानगरी बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्बस्फोटांनी हादरून गेली होती. सर्वत्र हाहाकार होता. लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरू झालेला दहशतवाद्यांचा हा हल्ला ताजमहाल हॉटेलवर संपला. (फोटो: पीटीआय)
-
भारतात २६ नोव्हेंबर २००८ ही अशी तारीख आहे की ती आठवून प्रत्येकाचे डोळे पाणावतात. या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या १० दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवाद्यांनी मुंबईतील गर्दीची ठिकाणे आणि प्रतिष्ठित इमारतींना लक्ष्य केले होते. (फोटो: पीटीआय)
-
आज २६/११ च्या हल्लाला १६ वर्ष पुर्ण झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्यांना निष्पाप नागरिकांना केवळ देशातूनच नाही तर जगभरातून लोक श्रद्धांजली वाहत आहेत. या दहशतवादी हल्ल्यावर अनेक चित्रपट आणि वेब सिरीजही बनवण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठ्या आणि क्रूर दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या मुंबई हल्ल्यावर कोणते चित्रपट आणि सिरीड पाहता येतील ते जाणून घ्या. (फोटो: Zee5)
-
हॉटेल मुंबई
मुंबई हल्ल्यावर आधारित हॉटेल मुंबई या चित्रपटात अनुपम खेर आणि देव पटेल मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट Zee5 वर पाहता येईल. (फोटो: Zee5) -
मुंबई डायरी (मुंबई डायरी 26/11)
मोहित रैना आणि कोंकणा सेन शर्मा स्टारर वेब सिरीज मुंबई डायरी प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. ही सिरीज देखील २६/११ च्या हल्ल्यावर आधारित आहे. (फोटो: प्राइम व्हिडिओ) -
ताजमहाल
२०१५ मध्ये ताजमहाल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता जो फ्रेंच-बेल्जियन चित्रपट होता. या चित्रपटात २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी ताजमहाल पॅलेस हॉटेलवर केलेला हल्ला दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (फोटो: प्राइम व्हिडिओ) -
मेजर
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेजर’ हा चित्रपट मुंबई हल्ल्यात शहीद झालेले भारतीय लष्कर अधिकारी संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहता येईल. (फोटो: नेटफ्लिक्स) -
स्टेज ऑफ सीज: 26/11 (State of Siege: 26/11)
स्टेज ऑफ सीज:२६/११ ही देखील मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये शोएब कबीरने अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. ही वेब सिरीज २०२० मध्ये रिलीज झाली आणि तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर पाहता येईल. (फोटो: Zee5) -
द अटॅक्स ऑफ 26/11 (The Attacks of 26/11)
मुंबई हल्ल्याच्या पाच वर्षांनंतर, ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला ज्यामध्ये नाना पाटेकर आणि अतुल कुलकर्णी यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. या चित्रपटात संजीव जयस्वाल याने दहशतवादी कसाबची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता. (फोटो: जिओ सिनेमा)
हेही पाहा- Pushpa 2 मधील ‘किसिक’ गाण्यासाठी ‘डान्सिंग क्वीन’ श्रीलीलाने आकारले ‘इतके’ कोटी!

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी