-
मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर ७ वर्षांनी अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हेअर आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. आता अरबाज आणि शूराच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि यावेळी दोघांचेही काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
अरबाज खान आणि शूराने लेटेस्ट फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये शूरा खान साडीमध्ये दिसत असून लोकांना तिची पारंपरिक शैली खूपच आवडली आहे. अरबाजही कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहे.
-
शूरा आणि अरबाज दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसापूर्वी हे सुंदर फोटोशूट केले आहे, या फोटोंचे चाहतेही कौतुक करताना दिसत आहेत.
-
हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना दोघांनी ‘जस्ट बीइंग यू’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोंवर दोघांच्याही चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. काहींनी या जोडीच्या फोटोंवर गॉर्जियस अशी कमेंट केली आहे तर काहींनी माशाअल्लाह म्हटले आहे.
-
काहींनी असंही लिहिलं आहे की “अरबाजला शूरासारखी मुलगी मिळाली हे त्याच भाग्य आहे, ती खूप डाउन टू अर्थ आहे”, तर दुसरा म्हणाला “खान कुटुंबाला साजेल अशी सून आहे.”
-
तर आणखी काही जणांनी लिहिले “देवाने सुंदर जोडा बनवला आहे.” काहींनी तर अरबाजसाठी मलायकापेक्षा शूरा चांगली असल्याचेही म्हटले आहे.
-
दोघंही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात आणि त्यांचं बाँडिंगही कॅमेऱ्यात अतिशय नॅचरल आणि सुंदर आहे.
-
दरम्यान, शूरा अरबाजपेक्षा ५ किंवा १० वर्षांनी लहान नसून त्याच्यापेक्षा २३ वर्षांनी लहान आहे. असे असले तरी दोघांच्या वयातील फरक कधीच दिसून येत नाही.
-
तथापी शूराची अरबाजशिवाय मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहानसोबतही चांगली बॉन्डिंग आहे. (सर्व फोटो साभार- शूरा खान इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख