-
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यातून छोट्या साईराज केंद्रेने प्रेक्षकांचे मन जिंकले.
-
साईराज केंद्रे आता झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’या लोकप्रिय मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
-
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत साईराज अमोल उर्फ सिंबा या भूमिकेत दिसत आहे.
-
साईराजने अमोल या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
मालिकेतील भूमिकेबरोबरच साईराज विविध रिल्समधूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.
-
मालिकेतील इतर कलाकारांबरोबर तो सोशल मीडियावर रिल्स शेअर करताना दिसतो.
-
तो ज्या सहजतेने अभिनय करतो, त्यामुळे त्याचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
-
सोशल मीडियावर त्याचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स असलेले पाहायला मिळते.
-
मालिकेत सध्या अमोल कॅन्सरचा सामना करताना दिसत आहे.
-
मात्र, या आजाराचादेखील तो मोठ्या हिंमतीने सामना करताना दिसतो.
-
घरातील सर्वांचा तो लाडका आहे.
-
मालिकेत पुढे काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधलेले असते. (सर्व फोटो सौजन्य: साईराज केंद्रे इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”