-
मराठी सिनेविश्वातील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणून मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांना ओळखलं जातं.
-
मुग्धा-प्रथमेश नुकतेच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले होते.
-
गेल्या अनेक वर्षांपासून मुग्धा-प्रथमेश ‘मर्मबंधातली ठेव’ हा गाण्याचा कार्यक्रम करतात.
-
या कार्यक्रमाचे चाहते बाहेरगावी सुद्धा आहेत. त्यामुळे यासाठीच मुग्धा-प्रथमेश परदेश दौऱ्यावर गेले होते.
-
मुग्धा प्रथमेशचा परदेशातील मराठमोळा अंदाज सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
-
न्यूझीलंडमधल्या शोसाठी मुग्धाने खास काळ्या रंगाची आणि त्याच्या पदरावर रंगीबेरंगी प्रिंट असणारी साडी नेसली होती. तर, प्रथमेशने सुद्धा यावेळी पत्नीसह Twinning केल्याचं पाहायला मिळालं.
-
या दोघांनी न्यूझीलंडमध्ये मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. वडापावसह सात्विक घरगुती जेवणावर या दोघांनी ताव मारल्याचे फोटो प्रथमेशने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
जेवणातील मराठी पदार्थ असो किंवा शोसाठी केलेला पारंपरिक लूक या मुग्धा-प्रथमेशची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
मुग्धा-प्रथमेशने परदेशात जाऊन आपली मराठी संस्कृती जपल्याबद्दल नेटकरी या जोडप्याचं भरभरून कौतुक करत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे इन्स्टाग्राम )

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य