-
हिमांशी खुराना आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने रात्री उशिरा तिचा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
हिमांशी खुराना ही पंजाबी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका आहे. तिने ‘बिग बॉस १३’ मध्ये भाग घेतल्यानंतर संपूर्ण देशात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
-
ज्या दिवशी हिमांशीने ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केला त्याच दिवशी असीम रियाझ तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला. त्यानंतर काही दिवस फ्लर्ट केल्यानंतर असीमने हिमांशीला सांगितले की तो तिच्या प्रेमात पडला आहे.
-
पण त्यावेळी हिमांशी आधीच रिलेशनशिपमध्ये होती आणि तिची एंगेजमेंटटही झाली होती. त्यामुळे त्यावेळी तिने असीमचा प्रस्ताव नाकारला आणि काही कालावधीनंतर ती शोमधूनही बाहेर पडली.
-
यानंतर हिमांशीला जेव्हा असीमला सपोर्ट करण्याची संधी मिळाली तेव्हा तिने पुन्हा शोमध्ये प्रवेश केला. यावेळी परिस्थिती बदलली होती आणि हिमांशीच्या मनातही असीमबद्दल प्रेम भावना निर्माण झाल्या होत्या.
-
हिमांशी असीमच्या प्रेमात बुडाली आणि तिने १० वर्ष जुने नाते तोडून असीमला होकार दिला. या शोनंतर दोघेही एकमेकांना खूप दिवस डेट करत होते.
-
असीम रियाझने हिमांशीला हिऱ्याची अंगठीही भेट दिली होती, जी तिने ब्रेकअपनंतर काढून टाकली होती.
-
असीमसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर हिमांशीला लोकांच्या द्वेषाचाही सामना करावा लागला होता, पण दोघेही एकत्र आनंदी होते. त्यानंतर अचानक दोघांनी त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली.
-
(सर्व फोटो साभार – हिमांशी खुराणा/ इन्स्टाग्राम)

Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा