-
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये तेलंगणातील श्री रंगनायकस्वामी मंदिरात विवाह केला.
-
हा विवाह सोहळा खूप खास आणि खासगी स्वरुपाचा होता.
-
या विवाहसोहळ्यात मोजक्याच लोकांची उपस्थिती होती.
-
दरम्यान अदिती आणि सिद्धार्थने राजस्थानमध्ये दुसऱ्यांदा विवाह केला आहे.
-
या विवाहाचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
-
हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये अदिती आणि सिद्धार्थ दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.
-
यावेळी अदितीने अप्रतिम असा लाल रंगाचा लेहंगा परिधान केलेला दिसत आहे.
-
तर सिद्धार्थने मोती रंगाची शेरवानी परिधान केली आहे.
-
या फोटोंना त्यांनी “The best thing to hold on to in life is each other” असे कॅप्शन दिले आहे.
-
माध्यमांतील माहितीनुसार अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ हे २०२१ मध्ये प्रेमात पडले.
-
ते ‘महासमुद्रम’ या तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकत्र होते तेव्हा ते सुरुवातीला काही काळ मित्र होते, पण हळूहळू त्यांचे नाते प्रेमात बदलले.
-
२०२३ मध्ये त्यांच्या लव्हलाइफची माहिती समोर आली.
-
अदिती राव हैदरचा जन्म २८ ऑक्टोबर १९८६ रोजी झाला असून ती सध्या ३७ वर्षांची आहे.
-
तर सिद्धार्थचा जन्म १७ एप्रिल १९७९ रोजी झाला आहे, म्हणजे तो ४४ वर्षांचा आहे.
-
त्यामुळे त्या दोघांच्या वयात जवळपास ७ वर्षांचा फरक आहे.
-
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचे लग्न त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाचा क्षण आहे.
-
त्यांच्या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो साभार- अदिती राव हैदरी इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख