-
छोट्या पडद्यामुळे घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच रेश्मा शिंदे.
-
रेश्मा शिंदे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचं केळवण पार पडलं होतं.
-
आता रेश्माच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
रेश्माच्या हातावरच्या मेहंदी डिझाइनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
सनई-चौघडे, लग्नगाठ, नवरा-नवरीच्या प्रतिमा असलेली डिझायनर मेहंदी अभिनेत्रीच्या हातावर सजली आहे.
-
याशिवाय एका फोटोत रेश्माने हातावरच्या मेहंदीमध्ये २९ नोव्हेंबर लिहून घेतल्याचं समजत आहे. यावरून तिच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे.
-
मेहंदी सोहळ्यासाठी रेश्माने खास पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
सध्या संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या सगळ्या फोटोंना रेश्माने ‘माझी मेहंदी’ असं कॅप्शन दिलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम )

स्वारगेट बलात्कार प्रकरण : बस स्थानकातील सीसीटीव्हींबाबत महत्त्वाची माहिती, कॅमेऱ्यांचा रोख प्रवाशांऐवजी…